सुदर्शन, विवेक ठरले विजेते जायंट स्टारकेन अशोक खळे स्मृती मुंबई- खंडाळा सायकल शर्यत

मुंबई : प्रतिनिधी

माजी राष्ट्रीय विजेते आणि शिव छत्रपती पुरस्कार विजेते अशोक खळे जायंट स्टारकेन मुंबई- खंडाळा ९० किलोमीटर अतंराच्या सायकल शर्यतीच्या एलिट गटात पुण्याच्या सुदर्शन देवर्डेकरने बाजी मारली. एमटीबी हायब्रीड गटात जुन्नरच्या विवेक वायकरने वर्चस्व गाजवले तर मकरंद माने हा या शर्यतीतील शेडुंग या एकमेव प्राईमचा विजेता ठरला. अमेच्युर सायकलिंग असोसिएशन ऑफ बॉम्बे  सबअर्बन  डिस्ट्रिक्ट आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनतर्फे ही शर्यत आयोजित करण्यात आली होती.

खार येथून सुरु झालेल्या या शर्यतीचा चुनाभट्टीपर्यंत मार्ग हा न्यूट्रल झोन होता. त्यांनंतर मात्र शर्यतीत चांगली चुरस पहायला मिळाली. सकाळी लवकर शर्यत सुरु झाल्यामुळे थंड हवामानाचा फायदा  मिळाल्यामुळे खोपोलीपर्यंत सर्व सायकलपटू एकत्रच होते.

त्यामुळे स्पर्धेतील एकमेव प्राइम जिंकण्यासाठी सायकलपटूंनी जोरदार प्रयत्न केले. त्यात मकरंद मानेने १ तास १३ मिनिटे ०७ सेकंद या वेळेत शेडुंग प्राईमचे पारितोषिक जिंकले. सायकलपटूंसाठी नेहमीच आव्हानात्मक ठरलेल्या  भोर घाटाने यावेळीही सायकलपटूची परीक्षा पाहिली. पण घाटाचे आव्हान सहज पेलवताना सुदर्शनने २ तास १७ मिनिटे ०५ सेकंद या वेळेत ९० किलोमीटरचे अंतर पार करत पहिले स्थान मिळवले. सुदर्शन पाठोपाठ  विवेकने २ तास २४ मिनिटामध्ये हे अंतर पूर्ण करत एमटीबी गटाचे विजेतेपद मिळवले.

या शर्यतीचे औचित्य साधून अमेच्युर सायकलिंग असोसिएशन ऑफ बॉम्बे सबअर्बन  डिस्ट्रिक्ट तर्फे दिवंगत अशोक खळे यांच्या कुंटुंबीयांना ५८ हजार रुपयांचा निधी देण्यात आला. अशोक खळे यांचे चिरंजीव प्रथमेश खळे यांनी तो निधी स्वीकारला.

स्पर्धेतील विजेते

एलिट गट : सुदर्शन देवर्डेकर (पुणे), दिलीप माने , सरनेश शेडेकर.

एमटीबी हायब्रीड:: विवेक वायकर (जुन्नर, पुणे ), भीम रोकाय, उत्कर्ष जाधव.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर मुंबई येथे नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लिडरशिप फोरम २०२६च्या कार्यक्रमात व्यक्त केले मत

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठेचे आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत असून शासनाने   सज्ज आणि सक्षम प्रशासन उभारण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *