सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या पालनाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते फैजान मिर्झा

अटक करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे महाराष्ट्रात पालन केले जात आहे का,असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

फैजान मिर्झा बोलताना म्हणाले की,सर्वोच्च न्यायालयाने अर्नेष कुमार आणि सत्येंदर कुमार अन्थील  या प्रकरणांमध्ये अटकेसंदर्भात स्पष्ट निकष आणि मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. अनावश्यक अटक टाळण्यासाठी तसेच अटक ही कायदेशीर आणि आवश्यक कारणांवरच आधारित असावी, याबाबत न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनीही या निर्देशांच्या अनुषंगाने Standing Order जारी केले आहेत,असेही सांगितले.

फैजान मिर्झा म्हणाले की,मात्र, महाराष्ट्रातील अलीकडील काही अटकांच्या पार्श्वभूमीवर या मार्गदर्शक तत्त्वांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली का,अटक आवश्यक असल्याची कारणे पोलिसांनी नोंदवली आहेत का? तसेच अटकेची कारणे आणि त्यासंदर्भातील संबंधित कागदपत्रे व सामग्री न्यायालयासमोर सादर करण्यात आली आहे का? असे फैजान मिर्झा यांनी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना फैजान मिर्झा म्हणाले की, अटक प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न झाल्यास नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अलीकडील अटक प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाले आहे की नाही, याची स्पष्टता आवश्यक आहे.या पार्श्वभूमीवर अटक प्रक्रियेतील कायदेशीर निकष, असेही फैजान मिर्झा यांनी बोलताना म्हणाले.

About Editor

Check Also

आकाश फुंडकर यांची माहिती, महाराष्ट्रातील कामगार कल्याणकारी योजनांचे सुलभीकरण वेळेवर निधी उपलब्ध होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा यासाठी योजनांचे सुलभीकरण करण्यात आले आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *