विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला प्रतित्तुर भाजपच्या तिरंगा रॅलीचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी

सध्या केंद्र आणि राज्यातील सरकारची विकास कामे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे विरोधकांकडून भाजप आणि सरकारला बदनाम करण्याचा कट आखण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विरोधकांकडून संविधान बचाव रॅली काढण्यात येत आहे. मात्र विरोधकांच्या रॅलीला प्रतित्तुर म्हणून प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली.

दादर येथील वसंत स्मृती केंद्रात भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक झाली. यावेळी राज्यातील सामाजिक, राजकिय आणि सरकारकडून करण्यात येत असलेल्या कामांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील घोषणा केली.

यापूर्वी सरकारच्या विरोधात विरोधकांकडून काढण्यात आलेला हल्लाबोल मोर्चा अपयशी ठरला. त्याचा कोणताही परिणाम राज्यातील जनतेवर झालेला नसल्याचा दावा करत आता पुन्हा काढण्यात येत असलेल्या हल्लाबोलचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

कोरेगांव भिमा येथील प्रकरणानंतर काहीजणांकडून समाजात तेढ माजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सोर्हादाचे वातावरण राखण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना करण्यात आल्या. पक्ष कार्यकारणीच्या बैठकीत पक्षाच्या ध्येयधोरणावर चर्चा करण्यात आल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले.

कोरेंगांव भिमा हे मोठे षडयंत्र-मुख्यमंत्री

राज्यात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. जातीय तेढ निर्माण झाल्यास भाजप कार्यकर्त्यांनी तिरंगा झेड्याखाली सर्वांना सोबत आणावे अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कोरेगांव भिमाप्रकरणी मोठ्या प्रमाणावर षडयंत्र झालेले आहे. मात्र सरकारने याप्रकरणात आपली नीट जबाबदारी पार पाडली असून भाजप व सरकारची प्रतिमा खराब करण्यासाठीच अशा गोष्टी करण्यात येत असल्याचा आरोप करत लोकांशी जास्तीत जास्त संपर्क ठेवून निवडणूकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पक्षातील कार्यकर्त्यांना दिले.

 

About Editor

Check Also

सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पदवीस्तरावरचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु होणार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश घेता येणार

सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास व त्यासाठी सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *