विधानसभाध्यक्ष पदाकरिता या दोन नेत्यांच्या नावाची चर्चा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांची नावे आघाडीवर

मुंबई-नवी दिल्लीः प्रतिनिधी
राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या ठिकाणी विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाला प्रथम पसंती असून त्यांच्या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या नावाबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची उचलबांगडी होणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. राज्यात काँग्रेसचे आक्रमक नेतृत्व असावे आणि भाजपाबरोबर आघाडीतील इतर पक्षांनाही कटशाह देण्यासाठी एका सक्षम नेत्यांची गरज नवी दिल्लीतील नेत्यांना आहे. त्यामुळे विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाला दिल्लीतील नेत्यांनी पसंती दिल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कोअर ग्रुपमधील राजीव सातव यांच्या नावाची चर्चा होती. परंतु आता काँग्रेसचे अध्यक्ष पद स्विकारण्यासाठी राहुल गांधी यांनी तयारी सुरु केल्याने सातव यांना महाराष्ट्रात पाठविण्याचे रद्द करण्यात आले. त्यामुळे नाना पटोले यांचे नाव पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या नावे पुढे आली आहेत. या दोघांपैकी एकाची विधानसभाध्यक्ष पदी नियुक्ती करण्याचा विचार सुरु असून या पदासाठी या दोन नावांचीच चर्चा दिल्ली दरबारी सुरु असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, धर्मेंद्र प्रधानांसह रॅकेटमधील सर्वांना कठोर शिक्षा करा नीट प्रकरणी संसदेत चर्चा, विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करणे व पंतप्रधानांनी माफी मागेपर्यंत काँग्रेसचा लढा सुरुच राहणार

नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *