वक्फ मंडळावर राष्ट्रवादीच्या खासदाराबरोबर एमआयएच्या खासदाराची नियुक्ती मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर खासदार डॉ. फौजिया खान आणि खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी केली. यासंदर्भात अधिसूचना निर्गमित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

वक्फ अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार ‘राज्यातील मुस्लिम संसद सदस्य’ या संवर्गातून या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया तेहसीन अहमद खान आणि लोकसभा सदस्य सय्यद इम्तियाज जलील यांना औरंगाबाद येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात येत असल्याबाबत अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

 

About Editor

Check Also

उद्धव ठाकरे यांची टीका, निवडणूक मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मनमानी आज शिक्कामोर्तब झाली ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात टाकण्याची केली मागणी

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने देशातील  जवळपास २१ हून अधिक राज्यात एसआयआर अभियान राबविले. मात्र या अभियाना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *