गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटीव्ह संपर्कातील व्यक्तींनी तपासणी करण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची आज लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची कोरोना चाचणी करून होम क्वारंटाईन करून घ्यावे असे आवाहन गृहमंत्री देशमुख यांनी ट्विटरवरून केले.

मागील दोन चार दिवसांपासून देशमुख यांना अस्वस्थ जाणवत होते. तसेच त्यांना बारीक तापही आला होता. त्यामुळे त्यांनी आज कोरोना चाचणी केली असता ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

 

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांची माहिती, राज्यातील १० नगर पंचायती आणि परिषदांच्या विकास आराखड्यांना मंजुरी गेल्या दीड वर्षात १०० हून अधिक शहरांच्या विकास आराखड्यांना मान्यता

राज्यातील शहरी भागांचा सुनियोजित विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाने विशेष पावले उचलली आहेत. याच अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *