मुंबई : प्रतिनिधी
आर्थिक वर्ष २०१८ च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात २५ टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीला ९ हजार ४२३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर मागील वर्षीच्या या तिमाहीत रिलायन्सला ७ हजार ५३३ कोटींचा नफा झाला होता.
तिसऱ्या तिमाहीत रिलायन्सचे उत्पन्न ३०.५ टक्के वाढून १ लाख ९ हजार ९०५ कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षीच्या या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न ८४ हजार १८९ कोटी रुपये होते. तर तिमाही आधारावर कंपनीचे उत्पन्न ८.६ टक्के वाढले आहे.
जिओला ५०४ कोटींचा नफा
या तिमाहीत दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओनेही चांगली कामगिरी नोंदवली आहे. ऑक्टोंबर – डिसेंबर तिमाहीत जिओला ५०४ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत जिओला २७१ कोटींचा तोटा झाला होता. सध्या जिओचे १६ कोटी ग्राहक आहेत.
Tags jio profit increased reliance
Check Also
अमित शाह यांची अपेक्षा, लॅबग्रोन डायमंडच्या संपूर्ण मूल्यसाखळीत भारताने जागतिक नेतृत्व करावे नवी मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी पार्कमुळे एक लाख कोटींची गुंतवणूक, ५० हजार रोजगार अपेक्षित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिने उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक …
Marathi e-Batmya