सीरम इन्स्टीट्युटने लसीच्या किंमतीत केली घट: राज्य सरकारला दिलासा अदार पुनावाला यांची ट्विटद्वारे माहिती

मुंबई: प्रतिनिधी

देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आता केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारकडूनही लसीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. यापार्श्वभूमीवर सीरम इन्स्टीट्युटने आपल्या कोविशिल्ड या लसीच्या दरात १०० रूपयाने कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी आज आणि आतापासून करण्यात येणार असल्याची माहिती सीरम इन्स्टीट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी ट्विटरद्वारे दिली.  त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

१ मे महाराष्ट्र दिनापासून राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांसाठी मोफत लसीकरण मोहिम राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. केंद्र सरकारने सीरम आणि भारत बायोटेक कंपनीकडून राज्यांना जर लस खरेदी करायची असेल तर सीरमसाठी ४०० रूपये प्रती कुपीची किंमत निर्धारीत केली होती. तर भारत बायोटेकसाठी ६०० रूपयांचा दर निश्चित केला आहे. आता महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर लसींची मागणी वाढणार आहे. तसेच या मोफत लसीकरणासाठी १२ कोटी लसी लागणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर लसींची मागणी वाढणार असल्याने सीरम इन्स्टीट्युटने आपल्या लसीची किंमत १०० रूपयाने कमी केल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या राज्य सरकारने प्रती लस ४०० रूपये दराने ६ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. मात्र आता १०० रूपयाने किंमतीत घट झाल्याने राज्य सरकारचे काही प्रमाणात पैसे वाचणार आहेत. तसेच सीरमकडून लसींचा मोठा साठा उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारकडून सध्या बोलणीही सुरु आहे.

 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग ५५ लाख नागरिकांना औषधोपचाराचा देणार लाभ

महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *