भाजपा हटाओ, बेटी बचाओ… बात नारी सम्मान की… कृती गुनाहगारोंको छोडने की राष्ट्रवादी महिला बिल्कीस बानो प्रकरणी आक्रमक ;मोदी सरकारचा जाहीर निषेध...

बिल्कीस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कारातील अकरा दोषींना मोकाट सोडून महिलांवरील अत्याचाराचे उदात्तीकरण करणार्‍या गुजरातमधील भाजपा सरकारचा जाहीर निषेध… जाहीर निषेध… मै भी देश की बेटी हूँ, मुझे इन्साफ चाहिए… हमे माफ करो बिल्कीस बानो… मोदी के गुंडाराजमे औरतोंपर जुलम जबरदस्ती नही चलेगी… नही चलेगी… महिलाओं को दे सम्मान तो होगा देश महान… वाह मोदी तेरा खेल दोषी बाहर निर्दोष जेल… बलात्कारियों के लिए अमृतकाल… भाजपा हटाओ, बेटी बचाओ… बात नारी सम्मान की… कृती गुनाहगारोंको छोडने की… अशा गगनभेदी घोषणा देत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले.

१५ ऑगस्ट २०२२ रोजी एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना बिल्कीस बानो यांच्यावरील बलात्कारी नराधमांना गुजरातमध्ये शिक्षेतून सूट देऊन मुक्त करण्यात आले. हा स्वातंत्र्याला काळिमा फासणारा निर्णय म्हणजे एकट्या बिल्कीस बानोला नाही तर अखंड भारतातल्या स्त्रियांना डागण्या देणारा आहे. या निर्णयाविरोधात आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नवीन राष्ट्रवादी भवन मुंबई येथे हे आंदोलन करण्यात आले. शिवाय संपूर्ण भारतभर बिल्कीस बानो प्रकरणात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आले.

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय परभणीतील शेतकरी संवाद मेळाव्यातून मराठा समाजासह सर्व समाजघटकांना न्याय, सन्मान आणि विकास देण्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही

मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि अन्य सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *