राष्ट्रवादीची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; ‘या’ नेत्यांचा झाला समावेश महाराष्ट्रातून राष्ट्रीय कार्यकारिणीवर अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुप्रियाताई सुळे...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार तर उपाध्यक्षपदी खासदार प्रफुल पटेल आणि मुख्य जनरल सेक्रेटरी पदी खासदार सुनिल तटकरे यांची निवड जाहीर झाली आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्याने पक्षातील मुख्य जनरल सेक्रेटरी पदी खासदार सुनिल तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातून जनरल सेक्रेटरी पदी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नरेंद्र वर्मा यांची वर्णी लागली आहे. तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची निवड झाली आहे.

खासदार सुनिल तटकरे यांच्यावर पक्ष संघटना, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक, किसान सेलची जबाबदारी तर नरेंद्र वर्मा यांच्यावर मिडिया आणि आयटी व जितेंद्र आव्हाड यांच्यावर कामगार, एससी, एसटी व सहकार या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्रासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उड्डाण पुल राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण

राज्यातील नागरिकांना सुरक्षित कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करुन देतांनाच रेल्वे फाटका अभावी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *