नाशिक नांदूरनाका दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक येथील अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले

नाशिक- नांदूरनाका येथे झालेल्या खाजगी बसच्या भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करून या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.  अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

अपघाताच्या कारणांचा सर्वंकष चौकशीतून शोध घेतला जाईल. त्याबाबत सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळावरील  मदतीसाठी तसेच रूग्णालयातील उपचारासाठी सर्व यंत्रणा तातडीने कार्यान्वित व्हाव्यात यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, नाशिक येथील घटनास्थळाला मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. त्यानंतर जखमींची रूग्णालयात जाऊन भेट घेवून त्यांना धीर दिला.

कसा झाला अपघात-

चिंतामणी ट्रव्हल्सच्या बसला मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास एका ट्रकने धडक दिली. त्यानंतर काही वेळातच बसला आग लागली. अपघातादरम्यान सर्व प्रवाशी गाढ झोपेत होते. मात्र गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच काही प्रवाशांनी खिडकीतून जीव वाचविण्यासाठी उड्या मारल्या. तर ज्यांना गाडीतून बाहेर पळ काढता आला नाही अशा ११ प्रवाशांचा गाडीला लागलेल्या आगीत भाजून मृत्यू झाला. त्याचबरोबर गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरण्यात आल्याने अपघातानंतर अनेकांना गाडीतून बाहेर पडता आले नाही असे सांगण्यात येत आहे.

About Editor

Check Also

उदय भानू चिब यांची मागणी, IIT मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्रा. सुर्यनारायण दुल्लांना तत्काळ अटक करा राहुल गांधी यांचा साहिलच्या पालकांशी फोनवरून संवाद, काँग्रेस साहिलच्या कुटुंबियांसोबत, साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच राहिल.

आयआयटी IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याला संस्थेतील प्राध्यापकांनी जातीवाचक व मानसिक छळ केल्यामुळेच आत्महत्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *