अंधेरी पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर म्हणाले, वेट अॅण्ड वॉच

सध्या राज्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेतील बंडखोरी आणि फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे असे दोन्ही गट कोणाची ताकद अधिक हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच ठाकरे गटाला काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष इत्यादींनी पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना ते कोणाला पाठिंबा देणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रकाश आंबेडकरांनी वंचितची भूमिका स्पष्ट केली. ते शुक्रवारी १४ ऑक्टोबर यवतमाळमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत आहोत. मला वाटतं ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडे कोणीही पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही.

शिवसेनेच्या कोणत्याही गटाबाबत सकारात्मक नाही. मात्र, व्यवस्थेचा विचार केला, तर माझ्या दृष्टीने, पक्षाच्या दृष्टीने जे चुकीचं सुरू होतं त्याबाबत मी माझी भूमिका मांडली. त्यात मी कायद्याची बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला अनियंत्रित अधिकार दिले, तर काय होऊ शकतं याची सर्वोच्च न्यायालयानेच मांडलेली जंत्री मी लोकांसमोर मांडली, असेही ते म्हणाले.

दुसरं एखाद्या मुख्यमंत्र्याने कायदेशीर पेचप्रसंग तयार झाल्याने राजीनामा दिला, तर पुन्हा सरकार स्थापनेबाबतचा अधिकार राज्यपालांना आहे का? हा या प्रकरणातील महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने त्या काळातील संकेत महत्त्वाचे आहेत. ते संकेत सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित करण्याची गरज आहे. म्हणून आम्ही भूमिका घेतोय की, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेची तपासणी केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

मला असं दिसत होतं की अनेकजण हे मानायलाच तयार नव्हते. सभापतींनी १६ जणांच्या निलंबनावरील स्थगिती उठवली की नाही याचा कोठेही खुलासा होत नाही, अशी स्थिती आहे असेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, १ जुलैपासून वाहनांना एचएसआरपी बसविणे अनिवार्य नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड

राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्याबरोबरच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने १ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *