पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब घटनेच्या वृत्ताने एकच खळबळ

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या चंदिगड येथील निवासस्थान परिसरात बॉम्बशेल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती समजताच पोलीस तसेच बॉम्बशोधक पथक या परिसरात दाखल झाले. पोलिसांनी बॉम्बशेल आढळलेला परिसर सील केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी बॉम्बशेल आढळला, तेथून पंजाब आणि हरियाणा अशा दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याचे निवासस्थान जवळच आहे. हा बॉम्बशेल आंब्याची बाग असलेल्या परिसरात आढळून आला.

हा भाग पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडपासून १ किमी अंतरावर तर भगवंत मान यांच्या निवासस्थानापासून २ किमी अंतरावर आहे.

या भागात एक जिवंत बॉम्बशेल आढळला आहे. या घटनेनंतर येथे पोलीस आणि बॉम्बशोधक पथक दाखल झाले. त्यांच्या मदतीने हा बॉम्बशेल निकामी करण्यात आला आहे. या परिसराती नाकेबंदी करण्यात आली आहे. बॉम्बशेल येथे कसा आला, याचा शोध घेतला जात असून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती चंदिगडमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संजीव कोहली यांनी दिली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतकऱ्यांची ४८ हजार कोटींची वीजबिल थकबाकी माफ शेतकऱ्यांच्या कृतज्ञता सोहळयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्यातील शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीजबिल आकारले जात नाही. मात्र, त्यांची वीज वापराची ४८ हजार कोटींची जुनी थकबाकीही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *