नाना पटोले यांचा इशारा, महाविकास आघाडीतच निवडणुक लढवा, अन्यथा… बाजार समिती, खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाशी युती करु नये

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्यात महाविकास आघाडी आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचा पक्षाचा निर्णय आहे. परंतु काही ठिकाणी शिंदे गट व भाजपाशी युती केल्याच्या तक्रारी येत आहेत, हे पक्षशिस्तीचे उल्लंघन आहे. अशी युती करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

नाना पटोले यावेळी बोलताना म्हणाले, राज्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीसह सहकार क्षेत्रातील सर्व प्रकारच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर वेगळा निर्णय घेऊ नये, यासंदर्भात सर्व जिल्हा व तालुका स्तरावरही सुचना देण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही प्रकारे पक्षशिस्तीचे उल्लंघन केलेले खपवून घेतले जाणार नाही हे लक्षात ठेवा व काँग्रेस पक्ष तसेच महाविकास आघाडी अबाधित राहिल याकडे लक्ष द्यावे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बजावले आहे.

About Editor

Check Also

गिरीश महाजन यांची माहिती, नेपाळमधील पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांसाठी केंद्र सरकारशी संपर्कात आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क, नेपाळमध्ये गेलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्याच्या प्रशासनाला सूचना

नेपाळ-तिबेट परिसरातील भूकंप, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तेथे गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती संकलित करण्यात येत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *