नाणार प्रकल्पविरोधी सभेसाठी राहुल गांधी येण्याची शक्यता प्रकल्पग्रस्तांनी घेतली दिल्लीत राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली : प्रतिनिधी

कोकणातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्प विरोधाच्या लढ्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सहभागी व्हावे यासाठी नाणार प्रकल्पग्रस्तांनी आज शनिवारी नवी दिल्ली येथे जावून त्यांची भेट घेतली. यावेळी प्रकल्पग्रस्तांसोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेत काँग्रेस प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी राहण्यार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.

नाणार येथील प्रकल्पाला स्थानिक गावकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने नाणार आणि त्या आजूबाजूच्या परिसरातील गावांना भेटी देत प्रकल्पग्रस्तांची भूमिका जाणून घेतली. या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आणि चर्चेचा एक अहवाल तयार करून तो प्रदेश काँग्रेसकडे सुपूर्द करण्यात आल्यानतर हा अहवाल नवी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवून देण्यात आला.

राहुल गांधी यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेत याप्रश्नी गावकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले. तसेच नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने २ एप्रिल २०१८ रोजी  नाणार येथे काँग्रेसने जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेला राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता अधिक असल्याचेही या शिष्टमंडळातील एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर वार्षिक १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला, तरी तत्काळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *