पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार नाहीत पण राहुल गांधीना कौल असेल तर विरोध नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा राहुल गांधींना पाठींबा

मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये सांगितले की, त्यांच्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळतील, त्यावेळी पंतप्रधान पदाची जबाबदारी घेईन. देशातील जनता त्यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी देणार असेल आणि तसा कौल घेणारच आहेत. तर त्यांना विरोध करण्याचा कुणालाही अधिकार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते काही बोलले असतील की, पवारसाहेब हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आहेत तर तसं नाही. शरद पवारसाहेबांनी वारंवार स्पष्ट केले आहे की, आमची मर्यादा काय आहे हे आम्हाला कळते. त्या पदासाठी आम्ही कधीही दावेदार राहणार नाही. ही भूमिका वारंवार पक्षामार्फत स्पष्ट करण्यात आली आहे. आज ज्याप्रकारे या देशात परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठेतरी सत्ताबदल निश्चित आहे. ज्याप्रकारे निकाल येईल त्यावेळी निर्णय होणार आहे असेही नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना सांगितले.

About Editor

Check Also

शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

देशात सुरु असेल्या जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *