गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागासाठी ५ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभागाचा निर्णय

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक गणेशमंडळांनी ५ सप्टेंबर २०२३ पूर्वी mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरिता स्पर्धा आयोजन करून अभिप्रायासह गुणांकन करून प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहे. समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करून तीन गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडिओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याकडे १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सादर करावेत.
निकालासंदर्भात स्वतंत्र सूचना देण्यात येतील. जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

About Editor

Check Also

आ. रईस शेख यांची मागणी कूपर आणि सायन रुग्णालयांत यंत्रांच्या खरेदी विलंबप्रकरणी विपिन शर्मा यांची चौकशी करा समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांचे पालिका आयुक्तांना पत्र

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कूपर आणि सायन रुग्णालयांसाठी क्ष-किरण यंत्रे खरेदी प्रकरणी दोन वर्षांच्या विलंबाकडे समाजवादी पक्षाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *