पुणे हे विद्येचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक वारशाचे माहेरघर आहे. तीन दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाला पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुण्याची सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित झाली आहे. पुढील वर्षी हा सांस्कृतिक महोत्सव ‘पुणे महोत्सव’ म्हणून राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त शनिवारवाड्याच्या …
Read More »सुनेत्रा अजित पवार यांचे आवाहन, सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित…शिस्तबद्ध साजरा करूया उपमुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा
पुणे शहरातील गणेशोत्सवाला देशभरातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीजपुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यरत ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक पार पडली. यावेळी …
Read More »गणेशोत्सवात साखर, बेसन, रवा अन् पामतेल सवलतीच्या दरात द्या मुंबई जनता दल (सेक्युलर) ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या महागाईने होरपळणाऱ्या मुंबईकरांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘मुंबई जनता दल (सेक्युलर)’तर्फे राज्य सरकारकडे एक महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र पाठवून गणेशोत्सवाच्या काळात आवश्यक असणारे किराणा साहित्य सवलतीच्या म्हणजेच अनुदानित दरात उपलब्ध करून देण्याची आग्रही विनंती केली आहे. …
Read More »यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला असून, यंदा राज्याच्या वतीने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर यंदाचा सोहळा विशेष ठरणार आहे. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, गणपतीसाठी तब्बल ६ लाख कोकणवासियांनी केला एसटीने प्रवास एसटीला मिळाले २३ कोटी ७७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले
गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातुन एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. तथापि, आप-आपल्या गावी, वाडया-वस्त्यावर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक …
Read More »लालबागचा राजाच्या विसर्जनाला भरती-ओहोटीचे विघ्न विसर्जन रात्री ११ वाजता होणार
रविवारी भव्य गणेश विसर्जनादरम्यान लालबागच्या राजाला निरोप देताना भाविकांचा प्रचंड समुद्र मुंबईत पावसाच्या सरीकडे पाहायला मिळाला. तथापि, पहिल्यांदाच, भरती-ओहोटीमुळे प्रतिष्ठित लालबागच्या राजा मूर्तीचे विसर्जन उशिरा झाले, असे एका वृत्तसंस्थेने दिले. आता, विसर्जन रात्री ११ वाजता होणार आहे. साधारणपणे, लालबागच्या राजा मूर्तीचे दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील खोल समुद्रात सकाळी ९ वाजण्यापूर्वी …
Read More »राज्य महोत्सवाच्या जल्लोषात गिरगाव चौपाटीवर गणरायाला निरोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक मंडळांनी निरोप दिला
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे, त्या उत्सवाचा जल्लोष आज गिरगाव चौपाटीवर उच्चांक गाठताना दिसला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून गणरायाला निरोप दिला. राज्य महोत्सवाच्या या उत्साहात गीरगाव चौपाटीवर विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, …
Read More »गणेशोत्सव : राज्य उत्सव अंतर्गत स्पर्धा व पोर्टलला उदंड प्रतिसाद सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांचे अधिक सहभागाचे आवाहन
राज्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवास २०२५ पासून राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. या राज्य उत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चा या वर्षापासून तालुकास्तरापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा जिल्हा व राज्यस्तरांसोबतच तालुकास्तरीय पारितोषिके देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रभरातील ४०४ मंडळांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला असून स्पर्धेचे …
Read More »‘श्रीगणेशा आरोग्याचा’ संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा …
Read More »आशिष शेलार यांच्या उपस्थितीत महागणेशोत्सव राज्य उत्सवानिमित्त गीत आणि पोर्टलचे लोकार्पण महागणेशोत्सवात सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा
सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, या महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या विभागांनी विविध उपक्रम, कार्यक्रम, उत्सव तसेच स्पर्धेचे आयोजन केले आहे. याचाच भाग म्हणून राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन मिळावे, यासाठी ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलची निर्मिती …
Read More »
Marathi e-Batmya