महेश कोठारेंच्या पाणी चित्रपटाचा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या हस्ते शुमारंभ पाणी टंचाई आणि ग्रामीण जीवनाचे विदारक वास्तवाचे दिग्दर्शन आदीनाथ कोठारे करणार

नांदेड : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील भीषण पाणीटंचाई व ग्रामीण जीवनाची विदारकता दाखविणारा सुप्रसिद्ध सिनेनिर्माता महेश कोठारे निर्मित व आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ या मराठी चित्रपटाचा शुभारंभ राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

हा चित्रपट ग्रामीण जीवनातील विदारक आर्थिक परिस्थिती व पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती या विषयासंदर्भात असून हा चित्रपट कंधार तालुक्यातील एका तांडा वस्ती परिसरात चित्रित करण्यात येणार आहे. चित्रपटाचा शुभारंभ कंधार तालुक्यातील रामनाईक तांडा या ठिकाणी करण्यात आला. यावेळी आ.सौ.अमिताताई चव्हाण, आ.अमरनाथ राजूरकर,चित्रपटाचे निर्माते महेश कोठारे, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे, सिनेदिग्दर्शक वामन केंद्रे, माजी आ.रोहिदास चव्हाण, चित्रपटातील कलावंत सुबोध भावे,सिद्धार्थ चोप्रा, कंधारचे माजी नगराध्यक्ष रामराव पवार, माजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, प्रशांत चालिकवार, संजय पवार आदिंची उपस्थिती होती.

About Editor

Check Also

अखेर सुनिता आहुजा यांनी घटस्फोटाची याचिका घेतली मागे, अभिनेता गोविंदास घटस्फोट दिलाच नाही वांद्रे येथील फॅमिली कोर्टातून याचिका घेतली मागे

त्यांच्या लग्नाबद्दल अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अटकळांनंतर, गोविंदाचे व्यवस्थापक, शशी सिन्हा यांनी इंडिया टुडेला दुजोरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *