परकीय चलनाच्या साठ्यात घट, ११ आठवड्यातील नीचांकी पातळी गाठली परकीय चलनाच्या साठ्यात घट, ११ आठवड्यातील नीचांकी पातळी गाठली

भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. परकीय चलन साठा ८ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ४.९९ अब्ज डॉलरने घसरून ५९३.९० अब्ज डॉलरवर आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. याआधीच्या आठवड्यात परकीय चलन साठा ४.०४ अब्ज डॉलरने वाढून ५९८.८९ अब्ज डॉलर झाला होता.

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, ८ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्याचा एक भाग असलेली परकीय चलन मालमत्ता ४.२६ अब्ज डॉलरने घसरून ५२६.४३ अब्ज डॉलर झाली आहे. सोन्याच्या साठ्याचे मूल्य ५५४ दशलक्ष डॉलरने घटून ४४.३८ अब्ज डॉलर झाले. तर स्पेशल ड्रॉइंग राइट्स १३४ दशलक्ष डॉलरने घसरून १८.०६ अब्ज डॉलर झाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे ठेवलेला देशाचा चलन साठा ३९ दशलक्ष डॉलरने कमी होऊन ५.०३ अब्ज डॉलर झाला आहे.

शेजारी देश पाकिस्तानमध्ये सध्या परिस्थिती चांगली नाही. पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात १ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात पुन्हा ४४.४ दशलक्ष डॉलरने घट झाली. आता फक्त १३.१२ अब्ज डॉलर परकीय चलनाचा साठा शिल्लक आहे. याच्या एक आठवडा आधी म्हणजे १८ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात तेथील परकीय चलनाच्या साठ्यात ७७.३ दशलक्ष डॉलर्सची घट झाली होती.

About Editor

Check Also

ईपीएफओच्या व्याज दरात काहीही बदल नाही २०११-१२ मधील व्याजदर ८.२५% चालू वर्षातही

सेवानिवृत्ती निधी संस्था ईपीएफओ EPFO ​​ने सोमवारी (२ मार्च २०२६) कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (EPF) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *