संजय राऊत यांची टीका, आता अशोक चव्हाणही हात चिन्हावर दावा करणार का?

राज्यातील काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा आज सकाळी राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीतील सहभागी पक्षाच्या नेत्यांना आर्श्चयाचा धक्का बसला आहे. शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्यावर खोचक टीका केली.

यावेळी संजय राऊत आपल्या ट्विटमधून बोलताना म्हणाले की, अशोक चव्हाण भाजपावासी झाले. विश्वासच बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते. चर्चा करीत होते. आज गेले अशी शोकात्मक खोचक टोला लगावला आहे.

तसेच संजय राऊत पुढे खोचक टीका करताना म्हणाले की, एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय ? असा सवाल करत आपल्या देशात काहीही घडू शकते असे सांगत अप्रत्यक्ष सांगत भाजपावर टीका केली.

About Editor

Check Also

आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा, प्रा. सुर्यनारायण डुल्लांना बरखास्त करा: झीनत शबरीन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *