अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या ३ जागा जिंकल्या विधानसभेत भाजपाबरोबर तिसऱ्यांदा सत्तेत

लोकसभा निवडणूकीसोबतच अरुणाचल प्रदेशातील २०२४ च्या विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडले. यावेळी पहिल्यांदाच भाजपाने उभ्या केलेल्या १० उमेदवारांच्या विरोधात विरोधा कोणीच निवडणूकीसाठी अर्ज भरला नव्हता. त्यामुळे निवडणूकीची प्रक्रिया सुरु असतानाच भाजपाच्या १० जागा बिनविरोध निवडणूक आल्या. त्यानंतर ५० जागांसाठी झालेल्या निवडणूकीत अजित पवार गटाच्या अर्थात पक्षाच्या ३ जागा जिंकत अरूणाचल प्रदेशात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने खाते उघडले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्यासह पक्षाचे प्रभारी मोहित पाटील आणि पूर्वोत्तर समन्वयक संजय प्रजापती यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीत विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार निकील कामीन, लेखा सोनी आणि टोकू टाटम हे राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतील असे सांगतानाच यावेळी मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी या विजयाचे श्रेय अरुणाचल प्रदेशातील पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांच्या प्रयत्नांना दिले.

विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण १०.०६ टक्के मते मिळाल्याचे सांगतानाच ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी विधानसभा निवडणूक लढवणे हे राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरील विश्वास, दूरदृष्टी आणि अरुणाचल प्रदेशासमोरील गंभीर समस्या सोडविण्याची क्षमता दाखवत आहे. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सर्वसमावेशक प्रशासनाची तत्त्वे कायम ठेवण्याचा संकल्प केल्याचेही सांगितले.

अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस लोकशाही मूल्ये जपण्यासाठी आणि संपूर्ण सामाजिक, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी समर्पित काम करत आहे. सर्वसमावेशक शासन आणि प्रगतीशील धोरणांसाठी वचनबद्धतेसह, राष्ट्रवादी काँग्रेसने भारतातील सर्व नागरिकांसाठी चांगले भविष्य घडवण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचेही ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

https://x.com/mahancpspeaks/status/1797221068974723084

About Editor

Check Also

अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा- विद्यार्थ्यांना दिलासा

राज्यातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *