नांदगांव मतदारसंघासाठी समीर भुजबळ यांचा मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला

नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगांव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत त्या जागेवरून उमेदवारी द्यावी यासाठी आग्रह धरला. मात्र नांदगांव विधानसभेची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेनेची असून तेथून सुहास कांदे हे विद्यमान आमदार आहेत. ती जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे नांदगांवच्या जागेवरून समीर भुजबळ यांची उमेदवारी जाहिर करणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे अखेर समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा देत नांदगांव मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी नांदगांव विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीकडे मागून घ्यावी आणि नांदगांव मधून समीर भुजबळ यांना उमेदवारी द्यावी यासाठी नांदगांव येथील काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्यासमोर निदर्शने केली. तसेच नांदगांवची जागा मागून घ्यावी अशी आग्रही मागणी केली.

मात्र अजित पवार यांनी नांदगांवची जागा मागून घेता येणार नसल्याचे स्पष्ट करत ती जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची असल्याचे सांगितले. तसेच महायुतीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे दोन्ही पक्ष घटक पक्ष आहेत. तसेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात महायुतीत आल्यापासून फारसे सख्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ यांना अधिकृत तिकिट जाहिर कऱणे अवघड असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामाही अजित पवार यांनी मागितल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात सुरु झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आज समीर भुजबळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा एक पत्राद्वारे दिले.

समीर भुजबळ यांचे राजीनामा पत्र

About Editor

Check Also

आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू १० मार्च पर्यंत करता येणार अर्ज

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *