मनोज जरांगेंच्या मोर्चावरून एकनाथ शिंदे म्हणाले की, कुणीही राजकिय भूमिका घेऊ नये गणेश भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय घेत उपोषणास सुरुवात केली आहे. त्यातच उपोषणाचा आज १८ वा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र अद्याप पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अद्याप परवानगी दिली नाही. परंतु मुंबईत पोहोचल्यावर आंदोलनाला परवानगी मुंबई पोलिसांकडून मिळेल असे गृहीत धरण्यात आले आहे.

मनोज जरांगे पाटील हे चार मुक्कामानंतर मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचतील असे सांगितले जात आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गणेशोत्सवात कोणतही विघ्न येता कामा नये. तसेच टीका करताना कुणीही राजकीय भूमिका घेऊ नये अशी भूमिकाही असल्याचे सूचक वक्तव्य करत एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा रोख कुणा कडे आहे याविषशीची चर्चा सुरु झाली आहे.

एकनाथ शिंदे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, गणेशोत्सवात कोणतेही विघ्न येता कामा नये, गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये, याची काळजी सरकार घेत आहे. या आधी ५८ मोर्चे झाले. त्या मोर्चाची नोंद जगाने घेतली. त्या मोर्चाच्या माध्यमातून कधीही कोणाचीही अडचण झाली नाही किंवा होऊ दिली नाही. त्यामुळे सरकार म्हणून आमची इच्छा आहे की गणेशोत्सवात कोणाजीही गैरसोय होऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

तसेच पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकार म्हणून आमच्यावर टीका करण्याचा अधिकार लोकशाहीत कोणालाही आहे. मात्र, टीका करत असताना त्यामध्ये समाजाची बाजू असली पाहिजे, समजाला न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे, पण कुणीही राजकीय भूमिका घेता कामा नये. समाजाला न्याय देण्यासाठी एखादा झगडत असेल तर त्यासाठी सरकारने देखील मोठ्या मनाने मदत केली. हे सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे. सरकारने आठमुठेपणाची भूमिका कधी घेतली नाही. मग समोरच्या लोकांनीही आठमुठेपणाची घेऊ नये असेही यावेळी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे

१६ सप्टेंबर दुसरा मुक्काम श्रीगोंदा-अहिल्यानगर

१७ सप्टेंबर तिसरा मुक्काम हडपसर-पुणे

१८ सप्टेंबर चौथा मुक्काम खोपोली-रायगड

१९ सप्टेंबर पाचवा मुक्काम मुंबईच्या आझाद मैदानात दाखल

About Editor

Check Also

जयंत पाटील यांची टीका, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *