काँग्रेसची दुसरी यादी जाहिर या विद्यमान आमदारांसह यांना उमेदवारी सुनिल केदार यांच्या पत्नी अनुजा यांना सावनेरमधूनः मुंबईतील चार जागांसाठी उमेदवार जाहिर

महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहिर केल्यानंतर शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसकडून उमेदवारी जाहिर करण्यास सुरुवात झाली. यापैकी काँग्रेसकडून ४८ उमेदवारांची पहिली यादी रात्री उशीराने जाहिर करण्यात आली होती. त्यानंतर आज दुपारी काँग्रेसने विधानसभा निवडणूकीची यादी जाहिर केली.

विधानसभा निवडणूकीची काँग्रेसने दुसरी यादी जाहिर केली असून या यादीत सावनेरमधून विद्यमान आमदार सुनिल केदार यांना उमेदवारी जाहिर न करता सुनिल केदार यांच्या पत्नी अनुजा सुनिल केदार यांना उमेदवारी पक्षाने जाहिर केली आहे. तर रायगांव मधून काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार वसंत पुरके यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी जाहिर केली आहे.

याशिवाय जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तसेच विधानसभेचे माजी उपसभपती प्रमोद शेंडे यांचे सुपुत्र शेखर यांनाही काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तसेच मुंबईतील आणखी चार जागांसाठीही काँग्रेसने उमेदवार जाहिर केले. यात वसई विधानसभा मतदारसंघातून मधून विजय गोविंद पाटील कांदिवलीतून काळू भदोलिया, चारकोपमधू काळू प्रकाश जयप्रकाश सिंग आणि सायन कोविवाडा येथून गणेश कुमार यादव या चार जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूकीची काँग्रेसची जाहिर झालेली दुसरी यादी खालीलप्रमाणेः-

भुसावळ (अ.जा)- डॉ राजेश तुकाराम मानवटकर

जळगांव-जामोदः डॉ स्वाती संदीप वाकेकर

अकोटः मंगेश गणगणे

वर्धाः-शेखर प्रमोदबाबू शेंडे

सावनेरः-अनुजा सुनिल केदार

नागपूर दक्षिणः-गिरिष कृष्णराव पांडव

कामठीः-सुरेश यादवराव भोयार

भंडारा ( अ.जा)ः- पूजा गणेश ठावकर

अर्जूनी मोरगांव (अ.जा)ः दिलीप वामन बनसोड

आमगावं (अ.ज)ः राजकुमार लोटुजी पुरम

रायगांवः- वसंत चिंदूजी पुरके

यवतमाळः-अनिल बाळासाहेब शंकरराव मंगळूकर

अर्णी (अ.ज)ः-जितेंद्र शंकरराव मोघे

उमरखेड (अ.जा)ः साहेबराव दत्तात्रय कांबळे

जालनाः- कैलास किसनराव गोरंट्याल

औरंगाबाद पूर्वः-मधुकरराव किसनराव देशमुख

वसईः-विजय गोविंद पाटील

कांदीवली पूर्वः-काळू भदेलिया

चारकोपः-काळू जयप्रकाश सिंग

सायन कोळीवाडाः-गणेश कुमार यादव

श्रीरामपूर (अ.जा) ः-हेमंत ओगले

निलंगाः-अभयकुमार सतीशराव साळुंखे

शिरोळः-गणपतराव आप्पासाहेब पाटील

About Editor

Check Also

राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर २२६ तपासण्या पूर्ण; ५१ संस्था बंद, पुणे विषारी दारू प्रकरणानंतर कारवाई

पुण्यातील विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *