राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ७ उमेदवारांची ४ थी यादी जाहिर शरदचंद्र पवार पक्षाकडून या सात जणांना उमेदवारी

विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शेवटचा दिवस शिल्लक राहिलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सात उमेदवारांची चौथी यादी आज जाहिर करण्यात आली. या यादीत सातारा जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील आणि पुसद आणि सिंदखेडा येथील विधानसभा मतदारंसघातील उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे.

बारामतीतून युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चवथ्या उमेदवारांची यादी जाहिर केली. यात माण विधानसभा मतदारसंघातून प्रभाकर पागे यांना, काटोलमधून विद्यमान आमदार अनिल देशमुख यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सलील अनिल देशमुख यांना उमेदवारी जाहिर करण्यात आलेली आहे.

याशिवाय वैभव सदाशिव पाटील यांना खानापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तसेच वाईमधून अरूणादेवी पिसाळ यांना तर दौंडमधून रमेश थोरात यांना उमेदवारी जाहिर करण्यात आलेली आहे. याशिवाय पुसद विधानसभा मतदारसंघातून शरद मैद यांना तर सिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून संदीप बेंडसे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

या सात मतदारसंघांपैकी खानापूर, माण, वाई, दौड या मतदारसंघात शरद पवार यांचा प्रभाव आहे. त्याचबरोबर या चारही मतदारसंघातील मतदारांकडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या उमेदवारालाच येथील जनता मतदान करत आली आहे. त्यामुळे सात पैकी चार उमेदवार निवडूण येणार असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहिर करण्यात आलेल्या ७ उमेदवारांची यादी खालील प्रमाणे:-

माण- प्रभाकर पागे

काटोल- अनिल देशमुख यांच्याऐवजी सलील देशमुख यांना उमेदवारी

खानापूर- वैभव सदाशिव पाटील

वाई- अरूणादेवी पिसाळ

दौड-रमेश थोरात

पुसद-शरद मैद

सिंदखेडा-संदीप बेंडसे

 

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांचे भावूक उद्घगार, अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच काहीशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *