भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी नाशिकमध्ये देण्यात येणार मोफत प्रशिक्षण

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येते. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतीसाठी ३० डिसेंबर २०२४ ते ८ जानेवारी २०२५ या कालावधीत एस.एस.बी.(SSB) कोर्स क्र. ६० आयोजित करण्यात येत आहे. या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे २४ डिसेंबर २०२४ रोजी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. मुलाखतीस Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवरहल एस.एस.बी.-60 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत यावे.

एस.एस.बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावे.

कंम्बाईंड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.

विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com किंवा दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा हॉट्सअप क्र. 9156073306 यावर प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीद्वारे करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.

About Editor

Check Also

तुकाराम मुंढे, अश्विनी भिडे यांच्यासह १० आयएएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या

१ एप्रिलपासून राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. मात्र तत्पूर्वीच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *