शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी १०० कोटी रूपये मंजूर

एमएमआरडीएकडून उपलब्ध करून देणार

मुंबई : प्रतिनिधी

नियोजित शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी नाममात्र दरात जमिन उपलब्ध करून दिल्यानंतर या स्मारकाच्या उभारणीसाठी राज्य सरकारकडून १०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले. तसेच या स्मारकासाठी द्यावयाचे १०० कोटी रूपये एमएमआरडीएकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून स्मारकाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारीही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील एमएमआरडीएकडे सोपविण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची बुधवारी २३ जानेवारी रोजी जयंती असून स्मारकाच्या भूमिपूजनाचा घाट शिवसेनेकडून घालण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्मारकासाठी १०० कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे हे फक्त शिवसेनेचे नेते नव्हते. तर ते युतीचे नेते होते. त्यांच्यापासून युवा पिढीने प्रेरणा घ्यावी या उद्देशाने त्यांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी १०० कोटी रूपये एमएमआरडीएकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.   

About Editor

Check Also

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग

एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *