राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात केली वाढः असुधारीत वेतन कर्मचाऱ्यांनाही लाभ ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार राज्य सरकारने महागाई भत्यात केली वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता पर्यंत ५० टक्क्यापर्यंत असलेला महागाई भत्ता आता ५३ टक्क्यावर पोहोचला आहे. हा महागाई भत्ता १ जुलै २०२४ पासून देण्यात येणार आहे. तसेच हा भत्ता थकबाकीसह रोखीने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दर सहा महिन्यांनी वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारच्यावतीने महागाई भत्त्यामध्ये वाढ करणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून दर सहा महिन्याने  महागाई भत्ता जाहिर केली जाते. मात्र १ जुलै २०२४ रोजी महागाई भत्ता जाहिर करण्यात आला नव्हता. त्यामुळे राज्य सरकार महागाई भत्ता कधी जाहिर करणार असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र आज अखेर राज्य सरकारकडून महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यात आल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

हा महागाई भत्ता जानेवारी २०२५ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा अशी असे निर्देशही राज्य सरकारने प्रशासनाला दिले. विशेष म्हणजे असुधारीत वेतन संरचनेतील कर्मचाऱ्यांना ५ व्या वेतन आयोगाप्रमाणे ४४३ टक्क्यावरून ४५५ इतका महागाई भत्ता देण्यात येण्यात येणार आहे. तसेच या श्रेणीतील सरकारी कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार २३९ टक्के वर असलेला २४६ टक्केपर्यंत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

महागाई भत्त्यात वाढ करणारे तीन शासन निर्णय खालीलप्रमाणेः

 

About Editor

Check Also

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मंत्रिमंडळाची बैठक

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना १२ महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *