संजय राऊत यांची टीका, त्या तिघांची वक्तव्ये ऐकली तर कॉमेडी शो माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा

राज्यातील एका शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार की नाही असा सवाल केला असता त्याला उत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जे घेता पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट पाहता आणि कर्जमाफीच्या पैशानं करता काय असा सवाल साखरपुडे, लग्न… असा अजब सवाल करत शेतकऱ्यालाच सुनावलं. माणिकराव कोकाटे यांच्या त्या वक्तव्यावरून शिवसेना उबाठाचे संजय राऊत यांनी चांगलंच फैलावर घेत त्या तिघांची वक्तव्ये ऐकली तर कॉमेडी शो होईल असे वक्तव्य करत माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा असल्याची उपरोधिक टीकाही केली.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, माणिकराव कोकाटे मागील अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं की कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा झाले आहेत. त्यांनी या प्रकारची वक्तव्ये करू नयेत. शेतकऱ्यांना दुखावणारी वक्तव्ये केली नाही पाहिजे, अजित पवार यांनी प्रफुल पटेल आणि माणिकराव कोकाटे यांच्या सारख्यांना लगाम नाही घातला तर त्यांच काही खरं नाही. या तिघांचे भाषणं ऐकलं तर एक कॉमेडी शो सुरु केलेले दिसत आहे अशा खोचक शब्दात टीका केली.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवार कॉमेडी शो करतात असं नाही. तर त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचा कॉमेडी शो, दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रोज शेतकऱ्यांची टींगल करतात, खिल्ली उडवितात. या राज्यात काय चाललंय ? आरोग्य विभागात काम व्यवस्थित सुरु नाही, गृहखातं कोसळून गेलंय अशी टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचा मंत्रालयात ध्वजारोहण समारंभ

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *