जयंत पाटील यांचा इशारा,..हा खेळ आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही एकीकडे धर्माच्या नावावर लोकांमध्ये वितुष्ट निर्माण करून त्यांचं लक्ष विचलित करायचे

एकीकडे धर्माच्या नावावर लोकांमध्ये वितुष्ट निर्माण करून त्यांचं लक्ष विचलित करायचे आणि दुसरीकडे धर्मांच्या हक्काच्या जमिनी लाटायच्या, हा खेळ आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही अशी तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणावर दिली आहे.

आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली असून पुढे जयंत पाटील म्हणालेत की, आतापर्यंत राज्यातील हिंदू देवस्थानांच्या आणि मंदिरांच्या जमिनी सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी हडप केल्याचे आम्ही वारंवार निदर्शनास आणून दिले होते. आता त्यामध्ये पुण्यातील जैन समाजाच्या मंदिराच्या जागेचाही समावेश झाला आहे.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, पुण्यात मॅाडेल कॉलनी येथील जैन समाजाची जागा आहे. ज्या ठिकाणी जैन समाजाच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे व जैन समाजाचे जुने मंदिर देखिल आहे. परंतु ते मंदिर जागेवर न दाखवता, सर्व कायदे व नियम धाब्यावर बसवून ही जमीन हडपली असून २३० कोटींचा व्यवहार केला गेला आहे असे सांगितले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, विशेष म्हणजे सरकारी कार्यालयातून केवळ एका दिवसात या व्यवहाराला मंजूरी मिळते. सहकारी बँक ७० कोटींचे कर्ज विकासकाला एका दिवसात मंजूर करते. जैन समाजाच्या जागेच्या लिलावासाठी जे विकासक येतात ते तिघेपण सत्तारूढ पक्षातील एका सदस्याचे व्यावसायिक भागिदार आहेत असा आरोप करत असतानाच आज जैन समाजाने या प्रकरणावर मोठा मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला होता. या लढ्यासाठी आमचा जैन धर्मिंयांना संपूर्ण पाठिंबा तर आहेच पण आम्ही या लढ्यात जैन धर्मिंयांसोबत आहोत. सर्व कामांची सखोल चौकशी करून या प्रकल्पांच्या कामावर स्थगिती आणावी अशी मागणी केली.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांचा टोला, तुम्हाला १२ वर्षात जे करता आलं नाही, ते आम्ही तुमच्या आधी केलं सत्ताधाऱ्यांना टोले लागवत आणि चिमटे काढत जयंत पाटील यांनी कर्जमाफी योजनेची हवाच काढली !

२०१४ पर्यंत तत्कालीन राज्य शासनाने तिजोरीतून एकदाही कर्जमाफी केली नाही असे सत्ताधारी म्हणतात. २००८ मध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *