विद्यार्थ्यांवरील अत्याचाराविरोधात ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हा: ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

मुंबई : विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करण्यात आला याचा निषेध आहे आणि शासनाचा विरोध करण्याचं महाराष्ट्राने सुरुवात केलेली आहे. यापुढे विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला होऊ नये, छर्रे, गोळ्या, अश्रुधुर चालवू नये यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने या बंद मध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलताना केले.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, ज्या राजकीय पक्षांनी अजून भूमिका घेतल्या नाहीत त्यांनाही आम्ही असा आव्हान करत आहोत की, हा राजकीय प्रश्न नाही तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे म्हणून जे भाजपच्या विरोधात आहेत अशा त्या सर्व राजकीय पक्षांनी महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी व्हावं.
दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करण्यात आला, याचा निषेध आहे. शासनाच्या या कृत्याचा विरोध करण्याला महाराष्ट्राने सुरुवात केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी आवाहन करत म्हटले की, यापुढे विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला होऊ नये, छर्रे,  गोळ्या, अश्रुधुर चालवू नये, यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे.
ज्या राजकीय पक्षांनी अजून भूमिका घेतल्या नाहीत, त्यांनाही आम्ही असा आवाहन करत आहोत की, हा राजकीय प्रश्न नाही, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. म्हणून जे भाजपच्या विरोधात आहेत, अशा त्या सर्व राजकीय पक्षांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे. असे आंबेडकर यांनी म्हटले.
ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले की, टेरोटोरिआ आर्मी ही स्टँडबाय वरती ठेवण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर मध्ये रिझर्व पोलिस फोर्स  ठेवण्यात आला आहे त्याला सुद्धा स्टँडबाय ठेवून एअरलिफ्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
या लाठी हल्ल्याचा निषेध करताना ते म्हणाले की,  जो लाठी हल्ला झाला त्यात पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जंतर मंतर वरती एकही विद्यार्थी दिसू नये असे आदेश दिले होते. त्या आदेशाला धरुनच अमानुष अत्याचार विद्यार्थ्यांवर करण्यात आला या अत्याचाराचा निषेध आहे.

About Editor

Check Also

उद्धव ठाकरे यांची टीका, निवडणूक मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मनमानी आज शिक्कामोर्तब झाली ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात टाकण्याची केली मागणी

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने देशातील  जवळपास २१ हून अधिक राज्यात एसआयआर अभियान राबविले. मात्र या अभियाना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *