महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय ग्रंथाचा सात भाषांमध्ये अनुवाद करणार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांची घोषणा

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समग्र वाङ्मयाचा ग्रंथ हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोर बंजारा या सात भाषांमध्ये अनुवाद करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोर बंजारा या भाषांसाठी साहित्य अकादमी कार्यरत आहेत. या साहित्य अकादमींच्या माध्यमातून साहित्यिक आदान-प्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आज प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे एक दिवशीय अनुवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.

मराठीतील उत्कृष्ट साहित्यकृतींचा विविध भाषांमध्ये तसेच विविध भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींचा मराठीत अनुवाद करण्यास प्रोत्साहन देणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.

यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मराठी भाषेतील दर्जेदार वाङ्मय अन्य भाषांमध्ये गेले पाहिजे तसेच अन्य भाषांमधील वाङ्मय ही आपल्या भाषेत आले पाहिजे. भाषेला समृध्द करण्यासाठी अशा प्रकारचे आदान प्रदान महत्वाचे असून यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशतब्दी जयंती वर्ष असून भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यानिमित्ताने विविध उपक्रम राबविणार आहे. याचाच एक भाग म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचे वाङ्मय आपण या साहित्य अकादमीतर्फे सर्व सात भाषांमध्ये अनुवाद करु या, त्यासाठी आवश्यक ती सगळी मदत शासन करेल, असे त्यांनी जाहीर केले. या उपक्रमातंर्गत महात्मा ज्योतिबा फुले चरित्र साधन प्रकाशन समितीने २०१२ ला प्रकाशित केलेले महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय हा ८६१ पानांचा ग्रंथ सात भाषांमध्ये अनुवादीत करण्यात येणार आहे.

प्रख्यात लेखिका मंजिरी धामणकर, डॉ. शितला प्रसाद दुबे, अजित मन्याल, आलोक सिंह, प्रशांत वर्मा यांच्यासह अकदामीचे सचिव सचिन निबांळकर आदींसह विविध भाषेतील अनुवादक तसेच अभ्यासक सहभागी झाले होते.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, एसआयआर (SIR) रद्द करा, निवडणूक आयोगावर जनतेचा अविश्वास नवयुवकांचा नाव नोंदणीस थंड प्रतिसाद, असंतोष पाहता पुन्हा नव्याने अर्ज- ६ भरण्याची मुभा देण्यात आली

निवडणूक आयोगाने सुरु केलेली एसआयआर मोहिम सुरुवातीपासूनच अत्यंत गुंतागुंतीची व वेळकाढूपणाची ठरली आहे. आयोगाच्या कामाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *