इतका खोटारडा पंतप्रधान देशातील जनतेने पाहिला नाही नवाब मलिक यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान

मुंबई: प्रतिनिधी
पवारसाहेब काय बोलले याचा अभ्यास न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चुकीचा आणि खोटा प्रचार करत आहेत ते किती खोटारडे आहेत हे आज सिद्ध झाले आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाशिक येथील सभेत मोदींनी आज टिका केली. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी त्यांना थेट आव्हान दिले आहे.
पवारसाहेबांना पाकिस्तानचे शासक प्रशासक चांगले वाटतात ही देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असा आरोप करत पवारसाहेबांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट सांगितले होते की, पाकिस्तानमधील राज्यकर्ते आणि सैन्यदल यांची भूमिका भारत विरोधी आहे. तर जनता तशी नाही. परंतु त्याचा खोटा प्रचार मोदी व फडणवीस करत आहेत असल्याचे सांगितले.
तुमच्याकडे संपुर्ण यंत्रणा आहे. तुम्ही पुर्ण व्हिडिओ बघा बोलले असतील तर आम्हाला दाखवा आम्ही राजकारण सोडून देवू आणि तसे नसेल तर पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.
पाकिस्तानातील शासक प्रशासक आम्हाला चांगले वाटत नाही तर ते मोदींना चांगले वाटतात म्हणून तर ते नवाज शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेले होते. मग इतरांवर आरोप मोदी का करता असा सवालही त्यांनी केला.

About Editor

Check Also

मुंबईतील विधानभवनासह महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी विधानभवन केले रिकामे, प्रशासनात खळबळ

आंतरराष्ट्रीयस्तरावर अमेरिका आणि इस्रायलने इराण देशाच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *