समाजवादी पार्टी आमदार रईस शेख यांची मागणी, कोस्टल रोडवर बेस्ट बसची संख्या वाढवण्यात यावी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना पत्र, कोस्टल रोडवर दोन बस चालवणे हा सामान्य मुंबईकरावर अन्याय

सामान्य मुंबईकरांच्या करांमधून बांधण्यात आलेल्या ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारा मार्गा’वर (कोस्टल रोड ) अवघ्या दोन बस चालवणे सामान्य मुंबईकरांशी दुजाभाव आहे. प्रवासातील वेळ वाचवण्यासाठी उभारलेल्या किनारा मार्गावर बेस्ट बसची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली.

या संदर्भात आमदार रईस शेख यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि बेस्टच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी यांना पत्र पाठवले आहे.

यासंदर्भात आमदार रईस शेख यांनी सांगितले की, मुंबईच्या पश्चिम किनारी भागाची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेने किनारा रस्ता (धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारा रस्ता) बांधला. या रस्त्यावर पादचारी, अवजड वाहने, तीन चाकी, दुचाकी यांना बंदी आहे. सध्या या रस्त्यावर A८४ ( डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते ओशिवरा डेपो ) आणि A७८ (एनसीपीए ते भायखळा ) या केवळ दोनच बेस्ट बस सुरू आहेत.

आमदार रईस शेख पुढे बोलताना म्हणाले की, या दोन्ही बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. या मार्गावर आणखी बस वाढवण्याची गरज आहे. या प्रकल्पावर पालिका १२ हजार ७२१ कोटी रुपये खर्च करते आहे. सामान्य मुंबईकराच्या करामधूनच हा मार्ग बांधण्यात आला आहे. मात्र या मार्गावर पर्याप्त बेस्ट बसची संख्या नसल्यामुळे सामान्य मुंबईकर या मार्गाचा वापर करण्यासाठी टॅक्सीला मोठी किंमत मोजतो आहे, असा आरोप केला.

शेवटी बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, वेळेची बचत व्हावी यासाठी किनारा रस्ता बांधला. बेस्ट बससाठी या मार्गावर १२ ते ५० रुपये असे किरकोळ भाडे आहे. मात्र किनारा मार्गावर बेस्ट बसची संख्या अपुरी असल्यामुळे सामान्य मुंबईकरांना किनारा मार्गासाठी टॅक्सीचा महागडा पर्याय स्वीकारावा लागतो. बेस्टकडे कंत्राटी तत्वावरच्या २५३३ बस आहेत. त्यामुळे किनारा मार्गावर बेस्टला आणखी बस चालू करण्यासाठी अडचण नसावी, असा दावा आमदार राईस शेख यांनी आयुक्त आणि महाव्यवस्थापक यांना पाठवलेल्या पत्रात केला.

About Editor

Check Also

मुकुल वासनिक यांची टीका, ज्ञानेशकुमार हे मोदींचे प्यादे, माजी पंतप्रधानांवर केस चालते पण निवडणूक आयुक्तांवर नाही लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी देशात परिवर्तनाची गरज, परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल: डॉ. सिरिवेल्ला प्रसाद

देशाची लोकशाही व संविधान संपवण्याची प्रक्रिया मागील काही वर्षापासून सुरु आहे. स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य संपुष्टात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *