Tag Archives: bmc commissioner

आ. रईस शेख यांची मागणी कूपर आणि सायन रुग्णालयांत यंत्रांच्या खरेदी विलंबप्रकरणी विपिन शर्मा यांची चौकशी करा समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांचे पालिका आयुक्तांना पत्र

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कूपर आणि सायन रुग्णालयांसाठी क्ष-किरण यंत्रे खरेदी प्रकरणी दोन वर्षांच्या विलंबाकडे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी लक्ष वेधले. रोग निदानासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांच्या अभावामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला असून अनेकांना खाजगी रुग्णालयांत महागड्या उपचारांचा आधार घ्यावा लागत आहे, असा आरोप आमदार रईस शेख यांनी केला. आमदार रईस …

Read More »

आमदार रईस शेख यांचे बीएमसी आयुक्तांना पत्र, महापालिका शाळातील विद्यार्थ्यांची केशव सृष्टी येथे सहल नको केशवसृष्टीमध्ये विद्यार्थ्यांची सहल म्हणजे शिक्षणाचे भगवीकरण

बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित केशव सृष्टी (उत्तन- भाईंदर ) येथील प्रस्तावित शैक्षणिक सहल रद्द करण्यात यावी आणि महापालिकेकडून होत असलेले शिक्षणाचे भगवीकरण थांबवावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. आमदार रईस शेख यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना यासंदर्भात …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, बंद पडलेले मुंबई पार्किंग प्राधिकरण पुनरुज्जीवित करा पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहित केली मागणी

बृहन्मुंबई महानगरपालिका पार्किंग शुल्कात ४० टक्के वाढ करण्याच्या तयारीत असताना समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून शुल्कवाढ करण्यापूर्वी विद्यमान पार्किंग धोरणाचा आढावा घेण्याची आणि बंद पडलेले मुंबई पार्किंग प्राधिकरण (एमपीए) पुनरुज्जीवित करण्याची विनंती केली. पार्किंगला महसूल मिळवण्याचे साधन मानण्याऐवजी वाहतूक शिस्त …

Read More »

मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम घेणार छट पूजेच्या पूर्व तयारीचा आढावा मुंबई पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांशी करणार चर्चा

मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अमित साटम उद्या मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या छट पूजा या सणाच्या प्रशासकीय तयारीचा आढावा घेणार आहेत. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात शुक्रवार दुपारी १ वाजता ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुंबई परिसरातील विविध छट पूजा उत्सव …

Read More »

शिवसेना उबाठाच्या शिष्टमंडळाची मागणी, भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करू नका शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट, पालिका आयुक्तांनी दाखवला सकारात्मक प्रतिसाद

बोरिवली येथील भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करू नये तसेच पालिकेतर्फेच अद्यावत आणि सुसज्ज असे ९ मजल्यांचे ४९०खाटांचे रुग्णालय तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पालिका आयुक्तांसोबत झालेल्या …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी बृहन्मुंबई क्षेत्रात १० हजार १११ मतदान केंद्रे प्रत्येक केंद्रावर सरासरी १२०० मतदार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्ट‍िकोनातून बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे) मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या तुलनेत मतदान …

Read More »

कोरोना घोटाळ्याप्रकरणी संशयात असलेल्या इक्बालसिंह चहल यांच्याकडे गृह विभागाची धुरा मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडील गृह विभागाचा अतिरिक्त चार्ज काढला

मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून कामगिरी बजावत असताना कोरोना काळात झालेल्या घोटाळ्या प्रकरणी तत्कालीन पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना चौकशीसाठी ईडीने बोलावणे होते. तर केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावरून इक्बाल सिंह चहल यांची उचलबांगडी करण्याचे आदेश दिले होते. परंतु दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे …

Read More »

आशिष शेलार यांची मागणी, मुंबईपालिका आयुक्तांनी नाल्यावर येऊन पहावं

मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामात निष्काळजीपणा दाखवत आहे. त्यामुळे पालिकेने ७५ टक्के नालेसफाई कामांबाबत केलेले दावे हे खोटे व रतन खत्रीचे आकडे आहेत. या नालेसफाई कामांबाबत आपण असमाधानी आहोत, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आयुक्तानी नाल्यावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले. नालेसफाईच्या …

Read More »

इक्बाल सिंह चहल थेट मुख्यमंत्री कार्यालयातः आदित्य ठाकरे यांची टीका

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होताच निवडणूक आयोगाने ज्या अधिकाऱ्यांना तीन वर्षे पूर्ण झाले आहेत अशा अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश दिले. परंतु राज्य सरकारने राज्यातील इतर अधिकाऱ्यांच्या ऐवजी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना महानगरपालिकेच्या पदावर कायम ठेवण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर सुरु केला. मात्र अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून इक्बालसिंह चहल यांची …

Read More »

निःशुल्क आरोग्य सेवेसाठी मुंबई महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयात “झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी”

मुंबई महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयात देण्‍यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार नागरिकांना उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी “झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी” राबविण्यासाठी सविस्तर आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल यांना दिले आहेत. “झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी” राबविणारी मुंबई महानगरपालिका देशातली पहिली महापालिका ठरणार …

Read More »