मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून घडामोडींना मोठा वेग आला आहे. एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्यानंतर लगेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी वांद्रे येथील ताज हॉटेल मध्ये भेटले असून त्यांच्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसंदर्भात भेट सुरु आहे.
शिवसेनेनेला मुख्यमंत्री पद न देण्यासंदर्भात भाजपाच्या भूमिकेनंतर राज्यात स्थापन करण्यासंदर्भात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पडद्याआडून हालचाली सुरु केल्या. शरद पवार यांनी यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेवून त्यांनाही याबाबत परिस्थितीची माहिती करून दिली.
त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा हवा असेल तर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएतून बाहेर पडावे अशी अट घालण्यात आली होती. त्यानुसार शिवसेनेने एनडीएमध्ये सहभागी असलेल्या अरविंद सांवत यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यायला सांगितला. त्यामुळे एनडीएतून शिवसेना बाहेर पडली. त्यामुळे आता शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाआघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे. या बैठकीला उध्दव ठाकरे यांच्यासोबत आदीत्य ठाकरे हेही उपस्थित होते.
तसेच या महाआघाडीचे स्वरूप कसे असेल यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची भेट होत आहे. या दोघांमध्ये सविस्तर चर्चा होवून पवार हे सोनिया गांधी यांना त्याची माहिती देतील अशी विश्वसनीय माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका नेत्याने दिली.
Marathi e-Batmya