मुंबई : प्रतिनिधी नोट बंदी, जीएसटी करप्रणाली आणि रेरा कायद्यामुळे राज्यातील घर बांधणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्थिक मंदी आलेली आहे.त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जमिन आणि बांधकाम क्षेत्राचे शासकिय वाढीव दर राज्य सरकारने न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तसे आदेश ही राज्याच्या मुद्रांक शुल्क विभागाने जारी केलेल्या आपल्या आदेशात म्हटले …
Read More »इडक, क्षितीज आणि पळशीची पी.टी. मराठी चित्रपट परदेशी जाणार कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपटांची निवड
मुंबई : प्रतिनिधी मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने फ्रान्समध्ये ८ मे २०१८ ते १८ मे २०१८ या कालावधीत होणा-या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाकडून पाठविण्यात येणा-या ३ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेले चित्रपट पुढीलप्रमाणे- १) इडक (मे.किया फिल्मस प्रा.लि.), २) क्षितीज (मे.मिडिया फिल्म क्राफट), ३) …
Read More »प्रेम विवाह करणाऱ्यांनो आता निर्धास्त रहा आंतरजातीय विवाहासाठी लवकरच होणार स्वतंत्र कायदा
मुंबई : प्रतिनिधी तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या किंवा तारूण्यात असलेल्या अनेक तरूण-तरूणी वेगवेगळ्या जातीची, धर्माची आणि पंथाची असतात. मात्र प्रेम या एका धाग्यामुळे ते दोघेजण वेगवेगळ्या जातीची असली तरी एकत्र जीवन जगण्यासाठी रूढी-परंपरा आणि समाजाची बंधने जुगारून आंतरजातीय विवाह करतात. आता अशा आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांना संरक्षण मिळावे, जातीय सलोखा राखण्यासाठी महिलांना …
Read More »दलित, डाव्या संघटनांच्या भारत बंदच्या इशाऱ्यानंतर सरकारला आली जाग सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचा मंत्री बडोले यांचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी अधिकारी किंवा व्यक्तीविरुध्द विना चौकशी गुन्हा दाखल करता येणार नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत केंद्र आणि राज्य सरकार तर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या मागणीवरून सोमवारी २ एप्रिल रोजी भारत बंदची घोषणा राज्यासह देशभरातील दलित, डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या संघटनांनी भारत बंदची हाक …
Read More »शरीयत कायद्यात ढवळाढवळ करू नका म्हणत केंद्राच्या विरोधात मुस्लिम महिलांचा मोर्चा तीन तलाक विधेयक मागे घेण्याच्या मागणीवरून आझाद मैदानावर आंदोलन
मुंबईः प्रतिनिधी मुस्लिम समाजातील महिलांना अनिष्ट अशा तीन तलाक पध्दतीतून सोडविण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन तलाक विधेयकाच्या माध्यमातून कायदा आणण्यात येत आहे. मात्र हा कायदाच मुस्लिम समाजातील महिलांच्या विरोधात असल्याचे सांगत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या महिला शाखेने आज शनिवारी मोर्चा काढत विरोध दर्शविला. केंद्र सरकारच्या या नव्या कायद्यामुळे मुस्लिम समाजातील महिलांमध्ये …
Read More »२ एप्रिल रोजी भारत बंदः मुंबईत निषेध मार्च अँट्रोसिटी कायदा निकालाप्रकरणी दलित, डाव्या-पुरोगांमी संघटनांचा भारत बंद
मुंबईः प्रतिनिधी अँट्रोसिटी अँक्टखाली गुन्ह्या नोंदविन्यापूर्वी त्या गुन्ह्याचा संपूर्ण तपास करावा आणि त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देत गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला लगेच अटक करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे मतही नोंदविले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर केंद्र व राज्य सरकारने पुर्नविचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी २ …
Read More »७ वा वेतना आयोग देण्यासाठी संघटनांचे म्हणणे सरकार ४० दिवस ऐकणार आयोग समितीचे प्रमुख के.पी. बक्षी यांच्याकडून तारखा जाहीर
मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना ७ वेतन लागू करण्यासाठी माजी सनदी अधिकारी के.पी. बक्षी यांच्या नेतृत्वाखाली समिती विविध शासकिय कर्मचारी संघटनांची गाऱ्हाणी अर्थात म्हणणे ऐकणार आहे. हे म्हणणे ऐकण्यासाठी एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या पाच महिन्यातील ४० दिवसांच्या तारखा या समितीने जाहीर केल्या आहेत. वास्तविक पाहता आता …
Read More »श्रीदेवीवर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार पद्मश्रीमुळे नाही, तर मुख्यमंत्र्यांमुळे राज शिष्टाचार विभागाने माहिती अधिकारात माहिती दिल्याचा अनिल गलगलींचा दावा
मुंबई : प्रतिनिधी दुबईत चित्रपट अभिनेत्री अम्मा यंगर अय्यपन उर्फ श्रीदेवी यांच्या मृत्युनंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर करण्यात आलेले शासकिय इतमामातील अत्यंसंस्कार हे त्यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारामुळे नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशामुळे झाल्याची माहिती पुढे आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी …
Read More »रुपेरी पडद्यावर येणार ‘एक सत्य’ एक वास्तवादी चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला
मुंबई : प्रतिनिधी मराठी सिनेसृष्टीत आज विविध विषयांवरील वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमा बनत असून अशा सिनेमांना जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मसालापटांच्या तुलनेत वास्तववादी सिनेमांना मराठीमध्ये जास्त चाहतावर्ग लाभतो. मराठी रसिक चाणाक्ष असल्याने काही दिग्दर्शकही त्यांची आवडनिवड ओळखून सिनेमाची कथा निवडतात. ‘एक सत्य’ हा आगामी मराठी सिनेमा याच वाटेने जाणारा आहे. …
Read More »कृतीची अशीही सामाजिक बांधिलकी गरीब, अनाथांना कपड्यांचे वाटप करणार
मुंबई : प्रतिनिधी तेलुगू आणि तमिळ सिनेमांमध्ये यश मिळवल्यानंतर दोन वर्षांपूर्वी विक्रम भट यांच्या ‘राज : रिबूट’ या सिनेमात इम्रान हाश्मीसोबत जोडी जमवत बॅालिवुडमध्ये दाखल झालेली अभिनेत्री कृती खरबंदा सध्या चांगलीच फॅार्मात आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या रत्ना सिन्हा यांच्या ‘शादी में जरूर आना’ या सिनेमात ती राजकुमार रावसोबत दिसली. …
Read More »
Marathi e-Batmya