इलॉन मस्कच्या नेतृत्वाखालील एक्स X कॉर्पने एका महिन्याच्या कालावधीत तब्बल २१२,६२७ खात्यांवर बंदी घालून, बाल लैंगिक शोषण आणि असहमती नग्नतेला प्रोत्साहन देणाऱ्या सामग्रीवर लक्षणीय कारवाई केली असल्याची माहिती पुढे आली आहे. २६ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत भारतीय सायबर स्पेसमध्ये दहशतवादाचा प्रचार करणाऱ्या १,२३५ खाती काढून टाकल्याचा खुलासा या …
Read More »आता पीओएस ऑपरेटर्सनाही परवाने घ्यावे लागण्याची शक्यता थर्ड पार्टी पीओएस च्या काी कंपन्यांवर परिणाम होणार
वित्तीय सेवांच्या जगात लवकरच परवान्यांची एक नवीन श्रेणी जोडली जाणार आहे. ऑफलाइन पेमेंट इकोसिस्टमवर आणखी नियम आणून अशा व्यवहारांवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) ने पीओएस अर्थात पॉइंट ऑफ सेल्स (POS) व्यवसायात काम करण्यासाठी परवाने जारी करण्यासाठी मार्गदर्शक …
Read More »एलआयसीने अदानी कंपनीत गुंतवणूकीचे मुल्य वाढले ५९ टक्क्याने मूल्य वाढल्याचे उपल्बध आकडेवारीवरून दिसते
एलआयसीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अमेरिकास्थित हिंडेनबर्ग या संस्थेने आपला अहवाल जारी केल्यानंतर एलआयसीने अदानी समुहात गुंतवणूक केल्याचे आणि त्यात वाढ करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आणले होते. त्यानंतर अदानी समूहातील गुंतवणूकीच्या मूल्यात वाढ झाल्याचे बिझनेस स्टॅण्डर्डने दिलेल्या …
Read More »इराण-इस्त्रायलच्या युध्द परिस्थितीचा भारतीय बाजारावर होणार परिणाम तेल, सोने आदी वस्तू महाग होण्याची शक्यता
इस्त्रायल हमास दरम्यान सुरु झालेल्या युध्दानंतर आता इस्त्रायल- इराण यांच्यात युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच इराणने इस्त्रायलचे जहाज जप्त केल्याने त्यात आणखीनच भर पडली आहे. मात्र या युध्दाचा परिणाम भारतातील इक्विटी आणि सराफा बाजारावर पडणार असून भारतातील अनेक वस्तू महागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इस्रायल आणि इराणमधील सध्याच्या …
Read More »मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, … लढाई मनुवादी विचारधारेच्या विरोधात
काँग्रेसची लढाई भाजपा, नरेंद्र मोदी किंवा नितीन गडकरी यांच्या विरोधात नसून मनुवादी विचारधारेच्या विरोधात आहे, देशाचे संविधान व लोकशाही कायम राखण्यासाठी आहे. आम्हाला हिटलर बनायचे नाही, देशात सर्व धर्माचे लोक एकत्र रहावे हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवले आहे. काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, देशासाठी काँग्रेसचे लोक फासावर चढले, नरेंद्र मोदींच्या …
Read More »अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा
संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत मोफत उपचार, घराघरात पाईप गॅस जोडणी, गरीबांच्या घरात मोफत वीज, प्रत्येक क्षेत्रात युवकांचे भविष्य उजळणाऱ्या लाखो संधी, महिलांना आर्थिक समृद्धी, समृद्ध, संपन्न भारत हा मोदी सरकारचा संकल्प आहे. यासाठीच मोदी यांना तिसऱ्या वेळी पंतप्रधानपद द्या, …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, आमच्या पक्षाला बदनाम करण्याचे निरर्थक प्रयत्न
भाजपा आणि काँग्रेस दोघांनीही पैसे देऊन पोसलेल्या फेक न्यूज मशिनरीद्वारे माझ्याविरुद्ध खोटा प्रचार चालवल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, मला बदनाम करण्यासाठी ते मुद्दाम चुकीचे कोट केलेले ग्राफिक सगळीकडे फिरवत आहेत. या दोन्ही दलित, आदिवासी, ओबीसी, …
Read More »सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली
पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत गोळीबार केल्याची केल्याची घटना घडली. या गोळीबारात चार राऊंड झाडण्यात आल्या. तसेच हा गोळीबार सलमान खानसाठीच करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर या घटनेची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने रविवारी बॉलिवूड अभिनेता …
Read More »ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक
लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. आता २०१९ च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ठाण्यात सर्वांधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. २०१४ मध्ये या तिसऱ्या …
Read More »जगनमोहन रेड्डी यांच्यावरील हल्ल्याची निवडणूक आयोगाचे घेतली दखल
काल रात्री आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्या प्रचार यात्रेच्या दरम्यान काही अज्ञात जमावाकडून त्यांच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेत जगनमोहन रेड्डी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे जगनमोहन रेड्डी यांना अधिकची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वायएसआर काँग्रेसच्या काही नेत्यांनी या दगडफेकीवर टीडीपी अर्थात तेलगू देसम …
Read More »
Marathi e-Batmya