Breaking News

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अंशू सिन्हा यांची नियुक्ती महाराष्ट्र बाल हक्क आयोगावर करण्यात आली आहे. तर दिलीप गावडे यांची डेअरी डेव्हलमेंटच्या …

Read More »

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुटी न दिल्यास कारवाई

मतदानाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता मुंबई उपनगर जिल्ह्यात …

Read More »

नाना पटोले यांचे प्रत्युत्तर, …नरेंद्र मोदी इलेक्टोरल बाँडच्या खंडणीवर गप्प का?

काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा संकल्प हाती घेऊन ‘न्यायपत्र’ हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यापासून भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झोप उडालेली दिसत आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लिगची छाप असल्याचा पंतप्रधान मोदींचा आरोप हास्यास्पद असून इतिहासाचा अभ्यास नाही हे स्पष्ट दिसते. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात संपूर्ण देश रस्त्यावर उतरला …

Read More »

चंद्रपुरात पंतप्रधान मोदी म्हणाले,… लीगच्या भाषेला देश स्विकारणार का?

देशातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीचे वातावरण उन्हाबरोबर चांगलेच वाढताना दिसून आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान पार पडत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिरसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

संध्या सव्वालाखे यांचा आरोप, महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरवापर

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाचा वापर आता राजकीय कार्यक्रमासाठी केला जात असून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या आयोगाच्या कार्यालयातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचे काम आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे …

Read More »

महेश तपासे यांचा हल्लाबोल, मुख्यमंत्री करू शकले नाहीत स्वतःच्या मुलाच्या नावाची घोषणा

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी भाजप नेते व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केली. यावरूनच दिसून येते की एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपचा किती दबाव आहेत. स्वतःच्या मुलाची आणि स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराची मुख्यमंत्री शिंदे घोषणा करू शकले नाही किंबहुना भारतीय जनता पार्टीने त्यांना …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या त्या टीकेवरून काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दहा दिवस उरले असून, काँग्रेससह भाजपा आणि इतर प्रादेशिक पक्ष पूर्णतः निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील बस्तर येथे काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर टीका करताना जाहिरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याचा आरोप केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल रोजी विरोधी …

Read More »

अॅड प्रशांत भूषण यांचे मत, निवडणूक प्रक्रियेत व्यापक सुधारणांची आवश्यकता 

इलेक्टोरल बाँड मुळे सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक निधी मिळाला. यातून निवडणुकीत एक विषम संधी निर्माण झाली. हे एका अर्थाने लोकशाही तत्त्वाच्या विरोधी आहे. यात कोठेही पारदर्शक्ता नव्हती, त्यामुळे हा कायदा रद्द होणे अटळच होते. पण या बरोबरच निवडणूक प्रक्रियेत अनेक सुधारणा करण्यात आल्या पाहिजेत असे मत ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी …

Read More »

कंपन्यांमध्ये क्रेज प्री आयपीओची मागील वर्षभरात फंड गोळा कऱण्यात या क्रेजचा मोठा वाटा

गेल्या आर्थिक वर्षात शेअर बाजारात पदार्पण करणाऱ्या कंपन्यांनी प्री-आयपीओ प्लेसमेंटद्वारे ₹१,३०० कोटींहून अधिक रक्कम जमा केली. गेल्या आर्थिक वर्षात या मार्गाद्वारे गोळा केलेल्या रकमेच्या तिप्पट आणि FY17 नंतरचा सर्वाधिक संग्रह, ज्या वर्षी डेटा उपलब्ध आहे. ही रक्कम FY24 मध्ये IPO द्वारे जमवलेल्या निधीच्या १.९३ टक्के आहे. अशा प्लेसमेंटमधून यापूर्वीची सर्वाधिक …

Read More »

देशातील या कंपन्यांचे मुल्यांकन वाढले १० पैकी ४ कंपन्यांची मोठी भरभराट

देशातील १० पैकी चार कंपन्यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या बाजार मूल्यांकनात रु. १,७१,३०९.२८ कोटींची भर घातली, ज्यात HDFC बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) इक्विटीमधील एकूण सकारात्मक ट्रेंडच्या अनुषंगाने सर्वात जास्त लाभधारक म्हणून उदयास आले आहेत. दुसरीकडे, टॉप १० पॅकमधील सहा कंपन्यांनी त्यांच्या बाजार मूल्यांकनास ७८,१२७.४८ कोटी रुपयांचा फटका बसला असून …

Read More »