Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, ‘स्मार्ट पीएचसी’ चा सातारा पॅटर्न राज्यभर राबविणार

राज्यातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज करण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘स्मार्ट पीएचसी’चा सातारा पॅटर्न राज्यभर राबविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा (स्मार्ट पीएचसी) व अन्य उपक्रमांचा …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ‘महायुती’ लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकणार

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील ११ घटक पक्षांचे १४ जानेवारी रोजी राज्यभर जिल्हावार मेळावे होणार असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केली. ‘महायुती’तर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, ….डोक्यात फक्त सत्ताच राहिली विचार नाही

आगामी लोकसभा निवडणूकीला आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. यापार्श्वभूमीवर आपापल्या पक्षाचे राजकिय पक्षाचे धोरण ठरविण्यासाठी कार्यकर्त्यांचे शिबिर आयोजित करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचेही शिर्डी येथे कार्यकर्त्यांचे आजपासून दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरात उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील म्हणाले, …

Read More »

नायगाव येथे दहा एकर जागेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले देशाला वरदान लाभलेले आहेत. त्यांच्यापासून सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे दहा एकर क्षेत्रात १०० कोटी रुपये खर्चून सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. थोर समाजसुधारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा १९३ …

Read More »

किरीट सोमैया यांच्याकडून शरद पवार यांच्यावर PAP घोटाळ्याचा आरोप

काही महिन्यांपूर्वी अर्थात राज्यात भाजपा प्रणित एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तास्थानी विराजमान झाले. त्यावेळी अजित पवार यांच्यावर जरांडेश्वर साखर कारखाना त्यांच्याच मालकीचा आणि हा कारखाना खरेदी करण्यासाठी जी कंपनी उभी करण्यात आली. ती कंपनीही अजित पवार यांच्या समर्थकाचीच असल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी …

Read More »

महाराष्ट्राचा ब्रॅड ‘महानंद’ दूध आता गुजरातच्या दावणीला बांधला

केंद्र सरकारच्या मदतीने सत्तेवर आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात दररोज महाराष्ट्राला लुटले जात आहे. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, मुंबईतील हिरे व्यापारानंतर आता राज्याच्या सहकार क्षेत्रावरही हल्ला केला जात असून सहकार क्षेत्रातील एक महत्वाचा व नावाजलेला दुग्ध प्रकल्प ‘महानंद’ डेअरी गुजरातच्या दावणीला बांधला जात आहे, असा गंभीर …

Read More »

मंत्री लोढा यांची घोषणा, बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगाराची संधी

इस्रायलमध्ये रोजगाराच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मंत्री लोढा म्हणाले की, …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा खोचक सल्ला,… अॅटीट्युड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभव…

देशातील लोकशाही संकटात असल्याचा आणि भाजपा, नरेंद्र मोदी यांच्या मनमानी कारभारामुळे राज्यघटनेनुसार चालणारी प्रक्रियाच संकटात आली असल्याचा आरोप काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. तसेच भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचा २०२४ च्या निवडणूकीत पराभव करण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील …

Read More »

चालकांच्या आंदोलनासमोर अखेर केंद्राची माघार गृह सचिवांनी दिले आश्वासन

केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या न्यायसंहिता अर्थात क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये बदल करत अपघातानंतर पळून जाणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात शिक्षा आणि दंडाची तरतूद केली. या तरतुदीच्या विरोधात ट्रक, टँकरसह विविध वाहन चालकांनी मागील दोन दिवसापासून देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले. त्यास विविध वाहन चालकांनी मोर्चे काढत पाठिंबा देण्यास सुरुवात केल्याने सर्वसामान्य जनतेसह …

Read More »

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले “हे” आदेश

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे हे पाहण्याचे स्पष्ट निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना बैठकीत दिले. मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या मराठा आरक्षण व सुविधा …

Read More »