Breaking News

प्रकाश आंबेडकर यांचा मनोज जरांगेना सल्ला, जी चूक सोनिया गांधींनी केली ती करू नका

२००९ साली गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार येणार होते. पण त्यावेळच्या काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना त्यांच्या सल्लागारांनी एका चुकीचे भाषांतर केलेल्या हिंदी वाक्य वापरायला लावले. त्या शब्दामुळे काँग्रेसची सत्ता आली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना माझे सांगणे आहे की, त्यांच्या सल्लागाराचा शब्द ऐकू नये नाही तर त्यांचा प्रश्न सुटणारच नाही …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, ओबीसीच्या नेत्यांनी माझ्या नादीला लागू नये…

आजच्या संविधान महासम्मान रॅलीच्या निमित्ताने काही हौशींनी सांगितले की, तुम्ही ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर बोला. तुम्ही मंडलच्या बाजूने की, कमडंलूच्या बाजूचे असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर मी आताच ओबीसी नेते छगन भुजबळ असो नाही तर प्रकाश शेंडगे यांना मी आत्ताच सांगतो की, माझ्या नादीला लागू नका. कारण तुम्ही ओबीसी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, संविधान जगातील पवित्र ग्रंथ, पण तोच बदलण्याची भाजपाची भाषा…

देशात २०१४ साली भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आणि त्यांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाने माणसाला माणसासारखं जगण्याचा हक्क दिला, पण भाजपा संविधानच मानत नाही, भाजपाचे नेते सातत्याने डॉ. बाबासाहेबांचे संविधान बदलण्याची भाषा जाहीरपणे करत असतात. संविधान हा जगातील सर्वात पवित्र ग्रंथ आहे. …

Read More »

राज्यात सर्वाधिक पोलीस गस्त नौका सागरी किनारा सुरक्षिततेसाठी

राज्यात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्या नंतर गृह विभागानकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षेचे उपाय योजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज्याच्या सागरी किनारा सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाय योजनांचा समावेश आहे. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक पोलीस गस्त नौका आहेत. सध्या राज्यात ३० पोलीस बोटी कार्यरत आहेत आणि राज्याच्या किनारपट्टीवर नियमितपणे गस्त घालत आहेत. …

Read More »

भुजबळांच्या वक्तव्यावरून अजित पवार यांची स्पष्टोक्ती, सध्या वाचाळवीर वाढलेत

सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोराची शाब्दीक चकमक सुरु आहे. त्यामुळे छगन भुजबळ आणि ओबीसी संघटनांचा ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध आहे. त्यातच छगन भुजबळ हे सरकारचा भाग असूनही नेमकी सरकारच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतात यावरून …

Read More »

पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट, एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील, असे घटक जसे पॅराग्लाइडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलूनच्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १८ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू करण्यात आले आहेत, असे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी कळविले आहे. मुंबई …

Read More »

अजित पवार यांचे निर्देश, शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही…

प्रशासकीय इमारतीचे आराखडे करतांना आगामी ५० वर्षाचा सर्वांगीण विचार करता एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन इमारतीचे आराखडे तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्याच्यावेळी दिले. यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, शिक्षण आयुक्त सूरज …

Read More »

अतुल सावे यांची घोषणा, परवडणाऱ्या घरांसाठी लवकरच नवीन धोरण

राज्यातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे घर मिळावे, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने नवीन गृहनिर्माण धोरण आखले जात आहे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी नुकतीच केली. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) च्यावतीने बांद्रा-कुर्ला संकुल मध्ये …

Read More »

माझी शाळा, सुंदर शाळा योजना समितीत या मंत्र्यांच्या ओएसडी, पीएचा समावेश जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप

राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणार आहे. या अभियानासाठी शासनाने जी समिती स्थापन केली …

Read More »

अखेर कतार न्यायालयाने शिक्षेच्या विरोधातील स्विकारली भारताची याचिका

साधारणतः महिनाभरापूर्वी कतारमधील भारतीय माजी नौसैनिकांना हेरगिरी आणि देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र भारत सरकारकडून त्यावर अधिकृतरित्या काहीच सांगण्यात येत नव्हते. अखेर नौसैनिकांच्या कुटुंबियांच्या दबावामुळे आणि प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे भारत सरकारकडून फाशीच्या शिक्षेविरोधात कतार न्यायालयात दाखल केलेली याचिका दाखल करून घेतली. वास्तविक पाहता कतार आणि भारत सरकारबरोबर …

Read More »