Breaking News

नऊ वर्षातील महागाईः टोमॅटोच्या सुरक्षेसाठी भाजी विक्रेत्याने ठेवले बॉऊन्सर टोमॅटो आणि मिर्चीच्या वाढत्या किमतीमुळे विक्रेत्याचा निर्णय

मागील काही दिवसांपासून देशाच्या बाजारात टोमॅटो आणि हिरवी मिर्चीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातील टोमॅटो आणि मिर्ची जवळपास गायब झाली आहे. तसेच या वाढत्या किंमतीवरून टोमॅटोवर समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर मीम्सही व्हायरल होत आहेत. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे टोमॅटो, मिर्चीच्या संरक्षणासाठी चक्क बॉऊन्सर …

Read More »

आमदार रवि राणा यांचा खोचक टोला, मुख्यमंत्री असताना काही करू शकले नाहीत आता तर… पावसाळी बेडकासारखे मतांची भीक मागत आहात

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना हनुमान चालीसावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न भाजपा समर्थक रवि राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यानंतर अमरावतीतीलच अचलपूरचे शिंदे समर्थक आमदार बच्चु कडू यांनाही शिंदे सरकारला पाठिंबा देण्यासाठी खोके घेतल्याचा आरोप करत एकच खळबळ माजवली. आता …

Read More »

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, आधी फोडाफोडीचे…..आता थेट पक्षच पळवला जातोय… पोहरादेवी शपथ बंद दाराआड अमित शाहबरोबरील चर्चेत अडीच अडीच वर्षेच ठरली

शिवसेनेतील फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता सुरुवात केली. तसेच या प्रक्रियेत बंडखोर गटाचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाची बांधणी करण्यास …

Read More »

छगन भुजबळ यांचे पवारांना प्रत्युत्तर, मीच येवल्याला आलो… गोंदिया पर्यंत माफी मागणार का? भविष्यकाळात आणखी गौप्यस्फोट करणार

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर नुकतेच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेला येवल्यातून पुन्हा एकदा पक्ष बांधण्याच्या दौऱ्याला सुरुवात केली. काल येवल्यातील पहिल्याच जाहिर सभेत बोलताना शरद पवार यांनी माझा अंदाज कधी चुकत नसतो. पण यावेळी चुकला असे सांगत मी तुमची माफी मागायला आलोय असे सांगत छगन भुजबळ …

Read More »

शिवसेनाः दोन्ही गटातील ५४ आमदारांना विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसा लेखी म्हणणे सादर करण्यास सात दिवसांची मुदत

शिवसेना नेमकी कोणाची आणि राज्यातील सत्तासंघर्षाच्यादृष्टीने महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देऊनही जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ लोटला गेला. विशेष म्हणजे त्यास येत्या ११ जुलै रोजी ९० दिवस पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांच्या पात्र-अपात्रेबाबतच्या कारवाईस सुरुवात केली आहे. …

Read More »

शरद पवार यांचे आव्हान, वय झाले ही गोष्ट खरी….गडी काय आहे हे तू पाहीलंय कुठे? माझा अंदाज चुकला...मी माफी मागायला आलोय

जनतेशी संवाद साधण्याचा हाती घेतलेला निर्धार आज नाशिक जिल्ह्यातील येवला येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधून सुरु झाला. एक काळ असा होता की नाशिक जिल्ह्यात गेल्यानंतर माझी पहिली फेरी येवला इथे असायची. आमचे अनेक सहकारी इथे होते. राजकारणात चढउतार झाला तरी त्या सहकाऱ्यांनी साथ कधी सोडली नाही. त्यामध्ये जनार्दन पाटील, मारोतीराव पवार, …

Read More »

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केंद्राची मान्यता वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांची माहिती

परभणी येथील १०० विद्यार्थी क्षमतेच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या ४३० रुग्णखाटांच्या रुग्णालयास केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून या शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश सुरू होणार आहे. राज्यातील हे २५ वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य आणि क्रीडा व …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रमास राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद गडचिरोलीमध्ये स्टील सिटी उभारण्याचे नियोजन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाने सर्वसामान्य जनतेच्या दारी शासनाच्या योजना पोहोचल्या असून राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले असून जिल्ह्याच्या ११ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला असे मुख्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या त्या टीकेवर शरद पवार यांनी दिले या तीन शब्दात उत्तर तोंडात अंजीर हातात खंजीर असल्याची मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती टीका

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेनेने पाठोपाठ झालेल्या बंडखोरीची चर्चा अद्याप खाली बसायला तयार नाही. त्यातच पक्षाच्या बांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा बंडखोरांच्या मतदारसंघातून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. मात्र गडचिरोली येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिघेजण …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार आले आणि आम्ही विकासाचं एक त्रिशुळ… विरोधकांच्या विरोधात त्रिशुळ म्हणून काम करू

गडचिरोली येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज ८ जुलै रोजी आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आमदार आणि भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत …

Read More »