Breaking News

छत्रपती संभाजी नगर नव्हे तर आता औरंगाबादच, उच्च न्यायालयाचा आदेश जिल्हाधिकाऱ्याकडूनही आदेश जारी

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर सर्वत्र संभाजीनगर उल्लेख होत आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर या याचिकांवर अंतिम निर्णय होईपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने जिल्ह्याचा उल्लेख आधीप्रमाणे औरंगाबादच करण्याचे निर्देश दिले. यानंतर औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला तसे आदेशही दिले. मात्र, जिल्ह्याचा उल्लेख संभाजीनगरच होत असल्याने आता इनामदार सय्यद …

Read More »

पुणे मेट्रोच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, पाच वर्षांतील मेट्रो प्रकल्पासाठीचा वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणाच्या या वर्षांच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता यावेळी देण्यात आली. जुलै २०१८ ते एप्रिल २०२३ या पाच वर्षांच्या काळातील प्राधिकरणाकडून विकास आणि बांधकाम प्रकरणांमध्ये वसुल करण्यात येणारे १०० टक्के वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ …

Read More »

रोहयोअंतर्गत कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ; १ लाख ६०हजारांचे अनुदान मिळणार रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची माहिती

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी १ लाख ६० हजार ३६७ रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की,खरीप हंगामात कांदा काढला की, लगेच मागणी असल्यामुळे विकला जातो किंवा रांगडा …

Read More »

संजय राऊत यांचे टीकास्त्र, हिंदुत्वाच्या नावावर टोळ्या निर्माण करून… राज्यातील सलोखा पध्दतशीर बिघडविण्याचा खेळ सुरु

आमच्याइतके कडवट हिंदुत्ववादी देशात कुणी नसतील आम्ही ढोंगी नाही सांगतानाच त्र्यंबकेश्वर हा आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय असून तिथे कधीही अशा घटना घडल्याचं माझ्या स्मरणात नाही. परवाच्या घटनेत कुणीही मंदिरात घुसल्याची माझ्याकडे माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचं पत्र त्यांना द्यायला लावलं आणि त्यांनीच आज त्र्यंबकेश्वरला आंदोलन सुरू …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी…. जलयुक्त शिवार, कृषी सिंचन योजनांचा आढावा बैठकीत दिले आदेश

अल् निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन् थेंब वाचविणे आणि तो जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. तसेच या योजनांमधील …

Read More »

ॲप आधारित टॅक्सीसाठी नियमावली येणार ; तुम्हीही सूचना पाठवू शकता मसुद्यासाठी नागरिकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन

ओला, उबर सारख्या ॲप आधारित वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांच्या प्रचलनासाठी नियमावली तयार करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे. यासंदर्भात मसूदा तयार करण्यासाठी नागरिकांचे अभिप्राय विचारात घेण्यात येणार असून नागरिकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र शासनाने ओला, उबर व इतर ॲग्रीगेटर कंपन्यांसाठी अॅप आधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या …

Read More »

जयंत पाटील यांनी सांगितला निर्णय, वाद निर्माण होण्याची शक्यता त्यामुळे…. राष्ट्रवादी काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीनंतर दिली माहिती

महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक गावात ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा कार्यक्रम घेण्यात येतो. यामध्ये गावप्रश्नापासून ते देशस्तरावरील प्रश्नांचा उहापोह होतो. त्यामुळे आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या कार्यक्रमावर अधिक भर द्यायचा असा निर्णय करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. जयंत पाटील म्हणाले, बुथ …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या जवळची माणसे म्हणतात, कधी कोणती भूमिका घ्यायची याचे भानच नाही मुख्यमंत्र्यांच्या अवती-भवतीच्या व्यक्तीकडूनच सुरु झालेल्या चर्चेला उधाण

राज्यात सत्तांतर होत मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाश शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपाचे (BJP) नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थानापन्न होऊन आता एक वर्ष पूर्ण होत आले. मात्र तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटाच्या मंत्र्यांना अद्याप कोणत्या राजकिय परिस्थितीत (Political Situation) काय निर्णय …

Read More »

चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करणार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

महाराष्ट्रात मराठीसह अन्य विषयांचे अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळेच येणाऱ्या काळाम चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये प्राईम …

Read More »

राहुल नार्वेकर यांची स्पष्टोक्ती, …दोन महिन्यात निर्णय कसा घेणार? भरत गोगावले यांची नियुक्ती पक्षानेच केली होती

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील शिवसेना फुटीवर आणि सत्तासंघर्ष प्रकरणी अंतिम निकाल देताना अनेक महत्वाचे निर्णय दिले. त्यामध्ये शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची प्रतोद पदी करण्यात आलेली नियुक्ती अवैध ठरविली. तर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विहित कालावधीत घ्यावा असे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले. यानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या दाव्यावर विधानसभा …

Read More »