Breaking News

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ग्रामीण भागात दिव्यांग आणि पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र घरकूल योजना तयार करावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमिहीन शेतमजुरांसाठी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे आमदार बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सहकार मंत्री …

Read More »

५१ दिवसानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर राज्य सरकारची माघार, मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील सरसकट ८६१ विद्यार्थ्यांच्या फेलोशिपची मागणी अखेर मान्य

राज्यातील ८६१ संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसाठी मागील ५१ दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करीत असलेल्या फेलोशिप संशोधक विद्यार्थी आंदोलन समितीच्या आंदोलनाला अखेर आज यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सामाजिक न्याय सचिव तसेच विद्यार्थ्यांच्या झालेल्या बैठकीत या सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असून विद्यार्थ्यांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या विविध …

Read More »

निवडणूकीतील उमेदवारीबाबत काँग्रेसची ही समन्वय समिती घेणार निर्णय प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक समन्वय समितीची स्थापना..

राज्यात आगामी काळात होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक समन्वय समितीची स्थापना केलेली आहे. १७ सदस्यांच्या या समितीचे अध्यक्ष काँग्रेस प्रातांध्यक्ष नाना पटोले आहेत तर सदस्यांमध्ये विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांचा सहभाग आहे. समन्वय समितीत माजी मंत्री …

Read More »

अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे मागणी, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण… काजू उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी सरकारने तातडीने ‘काजू बी’साठी हमीभाव जाहीर करावा;

नैसर्गिक आपत्तीमुळे काजू उत्पादनावर प्रतिकुल परिणाम होत असतानाच व्यापाऱ्यांच्या मनमानी धोरणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीला योग्य दर मिळत नाही. काजू उत्पादकांचे शोषण थांबविण्यासाठी सरकारने व्यापाऱ्यांच्या मनमानी धोरणाला चाप लावून ‘काजू बी’साठी १६० रुपयांचा हमी भाव जाहीर करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राव्दारे …

Read More »

पौष्टीक तृणधान्यासंदर्भात विविध विभागांनी अधिकाधिक उपक्रम राबवा मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचे निर्देश

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. राज्यात आपण महाराष्ट्र पौष्टीक तृणधान्य अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने शालेयस्तरापासून ते अगदी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दैनंदिन आहारातील पौष्टीक तृणधान्याचे महत्व पोहोचवण्यासाठी शासकीय विभागांनी अधिकाधिक उपक्रम राबविण्याची सूचना मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी केली. राज्य शासनाच्या …

Read More »

नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, मविआची राज्यभर वज्रमुठ…. महाविकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले

महाविकास आघाडी भक्कम असून आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीच्या राज्यभर वज्रमुठ सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या यशस्वी सभेनंतर आता १६ तारखेला नागपुरात सभा होत आहे त्यानंतर मुंबई व इतर ठिकाणी या सभा होणार आहेत. महाविकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले आहेत त्यामुळेच विरोधकांकडून आघाडीत मतभेद असल्याचा अपप्रचार केला जात …

Read More »

बाबरी विध्वंसाआडून चंद्रकांत पाटील यांचा नेमका कोणावर निशाणा, ‘शिंदे, फडणवीस कि ठाकरे ?’ देवेंद्र फडणवीसांची १८ दिवसांची जेलवारी आणि चंद्रकांत पाटील यांना अटक नाही

शिवसेनेतील फूटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार गेले. त्यानंतर राज्यात भाजपासोबतच्या सरकारची धुराही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. या सगळ्या परिस्थितीत जनमत आज स्थितीला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या बाजूने असल्याचे दिसून येत नाही. या सरकारबद्दल अद्यापही जनतेच्या मनात चांगली भावना नसल्याचे वेळोवेळी दिसून …

Read More »

त्या वृत्तावर अजित पवार म्हणाले, ती बातमी कशाच्या आधारावर दिली कळायला मार्ग नाही ती चौकशी तर अजून सुरु आहे क्लीनीट मिळाली नाही

गेल्या वर्षी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. ईडीनं यासंदर्भात अजित पवारांशी संबंधित व्यक्तींवर धाडीही घातल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ईडीकडून अजित पवार यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अशातच ईडीने या प्रकरणाच्या …

Read More »

अखेर बेपत्ता असलेला रॅपर राज मुंगसे आला बाहेर, सांगितलं नेमकं काय घडलं अंबरनाथ मंधील एका महिलेल्या तक्रारीवरून रॅपर मुंगासे झाला होता गायब

राज्यातील सत्तेसाठी फोडाफोडीच्या राजकिय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर मधील रॅपर तरुण राज मुंगसे याने अलीकडेच एक रॅप गाणं तयार केलं. त्याने चोर, ५० खोके, गुवाहाटी…अशा विविध शब्दांचा वापर करत सध्याच्या राजकीय स्थितीवर गाणं तयार केलं होतं. हे गाणं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आपल्या …

Read More »

शरद पवार भेटीसाठी उध्दव ठाकरे, संजय राऊत सिल्व्हर ओकवर; मात्र फोटो खुप काही बोलतो उध्दव ठाकरे, संजय राऊत एकाच रांगेत

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ठाकरे स्वत: पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी पोहचले होते. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत व्यक्त केलेली नाराजी, तसंच फडतूस-काडतूस वादावरुनही ठाकरे यांना सुनावलेले खडे बोल या पार्श्वभूमीवर …

Read More »