Breaking News

पदुम मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश, गोवंश प्रजनन नियमावली तयार करा आदर्श गोवंश प्रजनन नियमावलीबाबत ५ मेपर्यंत हरकती मागवा

गाय, म्हैस यांचे दूध वाढण्यासाठी आणि उच्च गुणवत्तेचे प्रजनन योग्य नर तयार करण्यासाठी गोवंश प्रजनन नियमावली राज्य शासन तयार करीत आहे. मात्र पशुपालक, गोपालकांच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी आदर्श गोवंश प्रजनन नियमावलीबाबत ५ मे २०२३ पर्यंत हरकती मागविण्याची सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी केली. शिवाय …

Read More »

मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित चित्रप्रदर्शन आठभर चित्रप्रदर्शन राहणार

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक व उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये …

Read More »

काँग्रेसची मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव समिती स्थापन तर निवडणूकीची या नेत्यांवर जबाबदारी प्रदेश काँग्रेसकडून मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समितीची स्थापना

मराठवाडा मुक्ती संग्रामचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून या लढ्यातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी तसेच या लढ्याच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसने मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समिती गठीत केली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील गौरव समिती मराठवाड्यातील सर्व विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. या …

Read More »

सुप्रिया सुळे संतापल्या, …महिलांबाबतचा तात्काळ तो निर्णय मागे घ्या पती गमाविलेल्या महिलांसाठी 'गंगा भागिरथी' हा निर्णय घाईघाईत

पती गमाविलेल्या महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये प्रयत्न सुरू असताना, सरकार ‘गंगा भागिरथी’ हा जो काही वेगळा विचार करीत आहे, तो घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो त्यामुळे तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन केली. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात …

Read More »

जयंत पाटील फडणवीसांच्या त्या फोटोवर म्हणाले, धर्माला जास्त महत्व…मुस्लिम राष्ट्रांमध्ये भारताची प्रगती आपण सर्व धर्मनिरपेक्ष विचाराने

अमेरिकेत कोणत्याही धर्माचा, जातीचा भेदभाव अजिबात नाही. त्यामुळे तो देश वेगाने प्रगती करु शकला. त्याच पध्दतीने भारताची प्रगती आपण सर्व धर्मनिरपेक्ष विचाराने आजपर्यंत करत आलो आहोत. मात्र आता अशा भूमिका भाजपाचे काही प्रमुख नेतेच मांडणार असतील तर ती चिंतेची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, विधवांना गंगा भागिरथी संबोधण्याने महिलांचा सन्मान कसा ? मंगल प्रभात लोढा मंत्री म्हणून पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कलंक

आधुनिक युगात महिलांनी सर्वच क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेली आहे पण आजही समाजातील काही घटक महिलांच्या प्रगतीत अडथळे निर्माण करत असतात. महिलांचे विश्व ‘चुल आणि मुल’ एवढेच मर्यादित असावे अशा बुरसटलेल्या विचारसरणीच्या मनुवादी भाजपा सरकारने पुन्हा एकदा महिलांचा अपमान केला आहे. विधवांना गं. भा. संबोधण्याचा प्रस्ताव आणण्याच्या हेतूमागे महिलांचा सन्मान नसून …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटावर नेहमीच्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर अरे जाऊ द्या रे.....

२१ जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड आणि त्यानंतर शिवसेनेत पडलेली उभी फूट ही आपण पाहिली आहेच. त्यानंतर सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांचा उल्लेख गद्दार असा करण्यात येतो आहे. तसंच दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीकाही होते आहे. अशात आदित्य ठाकरेंनी एक गंभीर आरोप एकनाथ शिंदेवर केला. एकनाथ शिंदे …

Read More »

त्या गौप्यस्फोटावर शिंदे गटाचे मंत्री म्हणाले, खोटं बोलण्याचं ट्रेनिंग सुरुय दिसतंय…. एजन्सी नेमलेली दिसतेय

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीला जवळपास ९ महिन्याचा कालावधी उलटून गेला. तसेच या नऊ महिन्यात शिंदे गटाकडून आणि ठाकरे गटाकडून सातत्याने वेगवेगळे खुलासे आतापर्यंत करण्यात आले. त्यानंतर आता पहिल्यांदाच बंडखोरी होण्यापूर्वी मातोश्रीवर गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी काय केले आणि काय कारण सांगितले याबाबतचा नवा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आमदार आदित्य …

Read More »

आदित्य ठाकरे यांनी सांगितले एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडामागील ‘हे’ कारण केवळ स्वतःची जागा वाचविण्यासाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले

राज्यातील सत्तांतरावरून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १० अपक्षांनी मूळ शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या घटनेला जवळपास नऊ महिने पूर्ण झाले. नेमक्या याच कालावधीत एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मोठे विधान करत बंडखोरी करण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे उध्दव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या मातोश्री या निवासस्थानी …

Read More »

वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमध्ये अतिरिक्त रेडिओलॉजी सेवा सुरु करा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांचे आदेश

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालयांमध्ये एमआरआय व सिटी स्कॅन सेवा कार्यान्वित आहेत. मात्र, वाढती रुग्ण संख्या असल्याने त्याकरिता प्रतिक्षायादी आहे. त्यामुळे या रुग्णालयात अतिरिक्त रेडिओलॉजी सेवा निर्माण करुन तात्काळ एमआरआय व सिटी स्कॅन सेवा उपलब्ध करुन देण्याच्या तसेच स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचना …

Read More »