राजपत्रित अधिकारी पदाचा ग्रेड-पे देण्याचा प्रस्ताव सरकारने मान्य केल्याने राज्यातील नायब तहसीलदारांनी आपला बेमुदत संप आज स्थगित केल्याची घोषणा केली. मे महिन्यापर्यंत नायब तहसीलदारांना त्यांच्या मागणीनुसार ग्रेड-पे मिळाला नाही तर पुन्हा संप केला जाईल असा इशाराही महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने दिला आहे. नायब तहसीलदारांना १९९८ मध्ये राजपत्रित …
Read More »संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा,…तर ते खरे गृहमंत्री शोभतील काडतूस असाल तर भ्रष्टाचाऱ्यांवर वापर करा
काडतूस असतील तर त्यांनी त्याचा वापर भ्रष्टाचाऱ्यांच्या करावा. तर ते खरे गृहमंत्री शोभतील. पण हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर बसवून विरोधकांवर काडतूस फेकून मारत आहेत. पण ती भिजलेली काडतूस आहेत. त्यामुळे काही होत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून सातत्याने गैरवापर …
Read More »गिरीश महाजन यांची स्पष्टोक्ती, कोरोना काळात मागे पडलेले अभियान पुन्हा सुरु राज्यात अवयवदान जनजागृती अभियान
महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अवयवदानाबाबत अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान उद्यापासून राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. अवयवदानाबाबतची चळवळ यापूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना राबविली होती. त्यावेळी अवयव …
Read More »महसूल मंत्री विखे-पाटील म्हणाले, नायब तहसिलदारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा नायब तहसिलदारांना संप मागे घेण्याचे महसूल मंत्र्यांचे आवाहन
राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार (राजपत्रित वर्ग २) यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. आज मंत्रालयात नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग -2 यांचे ग्रेड पे …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच केले, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं हे माध्यमांचं कर्तव्य मल्याळम वृत्तवाहिनी मिडिया वन ला न्यायालयाचा दिलासा
सर्वोच्च न्यायालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा आदेश चुकीचा ठरवला आहे, ज्याद्वारे राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाखाली मिडिया वन चॅनेलच्या प्रसारण परवान्याचे नूतनीकरण करण्यास सरकारकडून नकार देण्यात आला होता. गृह मंत्रालयाकडून सुरक्षेसंबंधी मंजुरी न मिळाल्यामुळे मीडिया वन चॅनेलच्या प्रसारण परवान्याचे नूतनीकरण करण्यास नकार दिला होता. त्यानंतर मीडिया वन वृत्तवाहिनीने केंद्र सरकारच्या या निर्णयाला …
Read More »पुण्यातील उद्धव ठाकरे सेना, राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश हर्षवर्धन पाटील आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश
उद्धव ठाकरे सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक रामशेठ गावडे पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पलांडे, नीरा बाजार समितीचे संचालक भानुकाका जगताप यांच्यासह पुणे जिल्ह्यातील उबाठा सेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय …
Read More »कार्यकर्त्यांच्या वन्समोअरवर आदित्य ठाकरे म्हणाले, असे लोक ‘ओनली वन्स’ होतात… गद्दार गँगला मदत करणाऱ्या चिलट्यांचे जेलभरो करणार
शिवसेना (ठाकरे गट) युवा सेनेच्या नेत्या रोशनी शिंदे यांना सोमवारी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने आज ठाण्यात जनक्षोभ मोर्चा काढण्यात आला. तीनही पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात एकत्र जमले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी …
Read More »मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत बारा हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर मंजूर प्रकरणांपैकी पन्नास टक्के लाभार्थी या महिला उद्योजक ६ हजार ३९५ महिलांना बॅंकेने कर्ज उपलब्ध
उद्योग विभागाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून बारा हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर झाले असून यामधून सुमारे एक लाखाहून अधिक युवकांच्या हातांना काम मिळणार आहे. या योजनेअंतर्गत राज्याने मागील वर्षापेक्षा अडीचशे टक्के अधिक काम करून शासनाने भरीव कामगिरी केली आहे. चालू आर्थिक वर्षात राज्याने एकूण १२ हजार ३२६ …
Read More »सुषमा अंधारे यांचा बावनकुळेंना सवाल, इतकी ताकद, ऐपत…मग फडणवीसांनी तुमचं तिकीट का कापलं? ४८ तासात मातोश्रीवर या आम्ही तुमचं स्वागत करू
ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केला. रोशनी शिंदे हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेतली. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणावरच गुन्हा दाखल केला नाही, यावरून उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. …
Read More »नारायण राणे यांची उध्दव ठाकरेंवर टीका, ‘मोले घातले रडाया…’ ओळीतून फटकारत महाफडतूस माणूस तोंडाला आवर घालावा, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार रहावे
अडीच वर्षांच्या सत्ताकाळात राज्याला अधोगतीकडे नेणा-या,कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणा-या, गुन्हेगारांना मदत करणा-या निष्क्रीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल यापुढील काळात अनुचित उद्गार काढू नये , अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे असा इशारा ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण …
Read More »
Marathi e-Batmya