संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा,…तर ते खरे गृहमंत्री शोभतील काडतूस असाल तर भ्रष्टाचाऱ्यांवर वापर करा

काडतूस असतील तर त्यांनी त्याचा वापर भ्रष्टाचाऱ्यांच्या करावा. तर ते खरे गृहमंत्री शोभतील. पण हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर बसवून विरोधकांवर काडतूस फेकून मारत आहेत. पण ती भिजलेली काडतूस आहेत. त्यामुळे काही होत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून सातत्याने गैरवापर होत असल्यामुळे देशातील १४ विरोधी पक्षांकडून ईडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका नुकतीच फेटाळली. यावर बोलताना संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाने याचिका तात्पुरती फेटाळली असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाण साधला.

संजय राऊत म्हणाले की, ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा विरोधकांच्या बाबतीमध्ये गैरप्रकार करत असल्याची आमची ठाम भूमिका आहे. ईडी आणि सीबीआयकडून पाठपुरावा होताच भारतीय जनता पक्षामध्ये सामिल झालेल्यांवर कारवाई होताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांकडे आणि सीबीआयकडे या राज्यातील दोन प्रकरणे पाठवली आहेत. यातील पहिले प्रकरण भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील ५०० कोटींचे मनी लाँडरिंगचे आहे. भाजपचे आमदार राहुल कुल यांनी यात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. हे सर्व ऑडिट रिपोर्टमध्ये दिल्यानंतरसुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. दुसरे प्रकरणात दादा भुसे यांनी ‘गिरणा ऍग्रो’ सहकारी साखर कारखाना वाचविण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून कोट्यांवधीचे शेअऱ गोळा केले. पण त्यांना गिरणा सरकारी साखर वाचवता आला नाही आणि त्यांना पैश्यांचा हिशोबही देता आला नाही. मात्र त्यांच्याबाबत काहीही कारवाई होत नाही.

मनी लाँडरिंग प्रकरणी हसन मुश्रीफ, अनिल परब यांच्यावर कारवाई होते, पण राहुल कुल आणि दादा भुसे यांच्यावर कारवाई का होत नाही याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे. ते काडतूस आहेत तर त्यांनी ते भ्रष्टांचाऱ्यांवर त्याचा वापर केला पाहिजे. पण हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर बसवून विरोधकांवर काडतूस फेकून मारत आहात. पण ती भिजलेली काडतूस आहेत. हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांना, गुंडांना पाठीशी घालत आहे. हे सरकार नसून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गुंड टोळ्या चालवत आहेत, असा घणाघातही राऊत यांनी केला.

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा दोन्ही जिल्ह्यातील महिला, शेतकरी, बचत गट, स्वयंसहायत्ता गटांसाठी बँक काम करेल

ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागा जिंकून दणदणीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *