Breaking News

लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सर्वसमावेशक तरतुदींचा समावेश असावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना हक्कांनुसार रोजगार उपलब्ध करून दिला जातो. वारसा हक्काच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वसमावेशक तरतुदींचा समावेश करून प्रारूप आराखडा सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीबाबत सुधारित तरतुदींच्या अनुषंगाने मंत्रिमंडळ उपसमितीस सादरीकरण आज दुपारी सह्याद्री अतिथीगृह …

Read More »

नाना पटोलेंचा आरोप, सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे षडयंत्र ईडीचे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दळभद्री सरकार

सीमाभागात कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत असून मराठी लोकांना मारहाण करुन त्यांच्या संपत्तीचे नुकसान केले जात आहे. महाराष्ट्राची जनता कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, महाराष्ट्राने संयमाची भूमिका घेतली आहे पण आमचा संयम सुटला तर कर्नाटक व केंद्र सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत सीमावाद उकरून …

Read More »

भाजपाचा इशारा संजय राऊत, चिथावणी देणे बंद करा, अन्यथा संयम सुटेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

. संजय राऊत यांनी तुरुंगात शिकलेली षंढ, नामर्द अशी भाषा वापरून चिथावणी देणे आणि आव्हान देणे बंद केले पाहिजे, अन्यथा संयम सुटेल आणि भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल, असा खणखणीत इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

काँग्रेस नेते थोरात यांचा सवाल, हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे? सीमा भागातील प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी

सीमा भागात कर्नाटकातून मराठी बांधवांवर होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर असून सीमा प्रश्नाने वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्रातील ट्रक, बस व वाहनांची तोडफोड केली जात आहे. महाराष्ट्र कर्नाटकची अशा प्रकारची दंडेली सहन करणार नाही. सीमाप्रश्नावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष चिंता व्यक्त करुन मराठी बांधवांच्या पाठीशी उभे राहिले पण मुख्यमंत्री मात्र गप्पच …

Read More »

शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ होण्यासाठी शासन निर्णय जारी

राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्याला आता सुलभरितीने प्रवेश घेता येणार आहे. शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) (Transfer Certificate) अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. …

Read More »

काँग्रेसकडून १९ किलोमीटर पदयात्रा काढून महामानवाला अभिवादन राहुल गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालत आहेतः बाळासाहेब थोरात

राहुल गांधी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर व त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चालत आहेत. बाबासाहेबांनी दिलेले संविधान वाचविण्यासाठीच राहुलजींनी साडे तीन हजार किलोमीटरची पदयात्रा काढली आहे व देशातील जनतेचा या यात्रेला मोठा पाठिंबा मिळत आहे असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. महापरिनिर्वाण …

Read More »

धारावीचे टेंडर विशिष्ट व्यक्तीला मिळाल्याने सीमावाद घडवून आणला का? शरद पवारांची भूमिका स्पष्ट अदानीला पुर्नविकासाचे टेंडरवरून साधला भाजपावर निशाणा

राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर अनेक दिवस चर्चेत नसलेला सीमावादाचा भाजपाच्या कर्नाटकातील मुद्दा अचानक पुढे आणला जात आहे. त्यातच या सीमावादाचा धारावी पुनर्विकास प्रकल्पाशी संबंध जोडला जात आहे. एका विशिष्ट व्यक्तीला हे टेंडर मिळावं आणि त्याला विरोध होऊ नये म्हणून हा वाद पुढे आणला …

Read More »

सीमावादावर भाजपा म्हणते, सत्तेत असताना शांत बसणा-यांना कंठ कसा फुटला? सीमाप्रश्नावरून भाजपाचा ठाकरेंना सवाल

जनादेश खुंटीवर टांगून बळकावलेली सत्ता गेल्यामुळे नैराश्य आलेल्या महाविकास आघाडीला विरोधकाची भूमिकाही जमत नसून त्यातून आलेल्या नैराश्यातून १७ डिसेंबरचा मोर्चा घोषित करण्यात आला अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गप्प, मात्र शरद पवारांचा इशाराः ४८ तास नाही, तर कर्नाटकात येतो महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केल्यानंतर शरद पवार यांनी दिला इशारा

मागील काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून सातत्याने महाराष्ट्रातील गावांवर दावा करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्राला चिथविणारी वक्तव्ये केली जात आहेत. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी आपला कर्नाटकचा दौरा रद्द केला. त्यातच आज बेळगावातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर कर्नाटकात हल्ला करण्यात आला. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून …

Read More »

लम्पी रोगावरील सरकारच्या उपाययोजना तकलादू; हजारो पशुधनांचा अजूनही मृत्यू १०० टक्के लसीकरण होऊनही लम्पी रोगाची लागण सुरुच- नाना पटोले

लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला अपयश आले आहे. लम्पी रोगाची लागण वाढत असताना राज्य सरकारने मोफत लसीकरण मोहिम राबवून १०० टक्के लसीकरण केल्याचा दावा केला आहे. राज्यात १०० टक्के लसीकरण झाले असेल तर आजही जनावरांना लम्पी रोगाची लागण का होत आहे ? व हजारो जनावरे मृत्यूमुखी का …

Read More »