जोपर्यंत अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करावे यासाठी आज राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन मागणी केली. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, मंत्री अब्दुल सत्तार …
Read More »या दोन इयत्तेचा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल सोमवार, ७ नोव्हेंबर २०२२ रोजी सायं. ६.०० वाजता …
Read More »“या” पाच महापुरूषांवर महानाट्य
महाराष्ट्राबाहेरील आणि देशाबाहेरील नाट्यसंस्थांना हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी दोन स्वतंत्र ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ५९ व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या गोवा येथे रविवारी आयोजित पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ नाट्य कलाकार विजय गोखले, सांस्कृतिक विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य …
Read More »सुधा मुर्ती आणि संभाजी भिडेंच्या या फोटोमागील सत्य : आवर्जून वाचा
कालपासून एका कार्यक्रमानिमित्त सांगलीमध्ये आलेल्या ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्ती यांनी शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांची भेट घेत त्यांच्या पाया पडल्याचे काही फोटो व्हायरल झाले. त्यामुळे बुध्दीमान आणि संवेदनशील असलेल्या सुधा मुर्ती या संभाजी भिडे यांच्या पाया कशा पडू शकतात असा सवाल अनेक नागरिकांना पडला …
Read More »जयंत पाटील यांचा पंतप्रधान मोदींना टोला, नोटबंदीचा दुखवटा अजून सरला नाही
देशात निर्माण होणाऱ्या काळा पैस्याला आळा घालण्यासाठी ११ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत देशात नोटबंदी जाहीर केली. या नोटबंदीमुळे रोजच्या आवश्यक जगण्यासाठीही नागरीकांना पैसे राहिले नाहीत. तसेच स्वत:जवळच्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बदलण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांना हातातील कामे बाजूला ठेवत बँकेच्या रांगेत उभा रहावे लागले. …
Read More »आशियाई बँकेने सांगितले मुख्यमंत्र्यांना या प्रकल्पांना अर्थसहाय्य सुरु
सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी समुह विकास प्रकल्पांसोबतच राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प, पर्यावरण स्नेही नवीन महाबळेश्वर प्रकल्प, पर्यटनाला चालना देणारा मुंबई-सिंधुदूर्ग सागरी महामार्ग प्रकल्प तसेच नदीजोड प्रकल्प, नाशिक, ठाणे आणि पुणे मेट्रो प्रकल्पांना आशियाई विकास बँक (एशियन डेव्हलपमेंट बँक) च्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आशियाई …
Read More »अॅड आंबेडकर म्हणाले, EWS आरक्षण हा बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट, मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर केली टीका
EWS आरक्षणावरती सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिला. हा निकाल पाहता हा वैचारिक भ्रष्टाचार आहे असेच याबद्दल म्हणता येईल. मागच्या दाराने पुन्हा मनुस्मृती आली आहे अशी खळबळजनक टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोलताना केली. ईडब्युएस आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर …
Read More »आदित्य ठाकरे म्हणाले, अब्दुल गद्दार…
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही अब्दुल सत्तारांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. निषेध करताना आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तारांचा उल्लेख ‘अब्दुल गद्दार’ असा केला आहे. तसेच अशी घाणेरडी लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवी आहेत का? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारला विचारला आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या …
Read More »आशियाई विकास बँकेबरोबरील बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी या प्रकल्पासाठी मागितला निधी
राज्यातील विकास प्रकल्पांना एशियन डेव्हलमेंट बँकेचे मोठे सहकार्य लाभत आहे. तसेच सहकार्य करत राज्यातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेच्या संचालक मंडळाला केले. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) कार्यकारी संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सत्तार यांच्या घरावर निदर्शने
औरंगाबाद येथे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अश्लिल शिवी देत आक्षेपार्ह विधान केले. शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिरात खोक्यावरून सुळे यांनी डिवचल्याबाबत प्रसार माध्यमांनी विचारले असता अब्दुल सत्तार यांनी शिवी देत विधान केले. सत्तार यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या …
Read More »
Marathi e-Batmya